pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -2024   धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये, शैक्षणिक संस्‍था, सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास निर्बंध

0 1 7 4 1 2

जालना/प्रतिनिधी,दि. 21

मा. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये, किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर घालण्यात आले आहेत.
जिल्हादंडाधिकारी जालना यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये आदेशाद्वारे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत (दि. 6 जून 2024 पर्यंत) निर्बंध घातले आहे, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे