स्त्री शक्ती फाउंडेशन च्या “उन्हाळी शिबिरास” उत्कृष्ट प्रतिसाद

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.18
पुणेः- पिंपरी -चिंचवड भागातील “स्त्री शक्ती फाउंडेशन “संचलित अध्यात्मिक गजानन बालसंस्कार केंद्राच्या वतीने दरवर्षी संस्थापक अध्यक्षा सौ.अर्चनाताई सोनार विविध सामाजिक उपक्रम राबविवात.त्यामध्ये लहान मुलांसाठी उन्हाळी शिबिराचा समावेश असतो.यावर्षी देखील आॕनलाईन उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
प्रामुख्याने या शिबिरात अध्यात्मिक गजानन बाल संस्कार केंद्र मधील मुलेच इतर अनेक मुलांना शिकवत असतात .यामध्ये सर्व मुलांनी लोकरीची टोपी ,छोटी कचरापेटी,राॕकेट,फिरता पाळणा ,एक ते वीस नंबर संस्कृतमध्ये तसेच वंदेमातरम,जनगणमन हे राष्ट्रगीत पियानो वर शिकविले.याशिवाय अंकाची गमंत,फारयरलेस कुकींग,बिस्कीट बाॕल,पेंटीग पोस्टर कलर आदी वस्तु कला कौशल्याने शिबिरात सहभागी मुला -मुलींनी बनविल्या.या आॕनलाईन दोन्ही दिवसाचे प्रशिक्षक सार्थक कर्णे व समर्थ कर्णे ,साईराज सरोदे,स्वर्ण दुसाने,जान्हवी जाधव,सर्वज्ञा कोरडे,स्वरा दुसाने ,मयुरा जोशी हे होते.यामध्ये प्रमुख मार्गदर्शक ज्येष्ठ समाजसेविका सौ.विजयाताई दहिवाळ व सौ.रुपालीताई दीक्षित व प्रमुख पाहुणे म्हणून सुवर्णवार्ता प्रसार वाहिणीचे मुख्य संपादक दिनेश येवले ,मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे व मान्यवरांनी या कार्यक्रमाचे खुप कौतुक केले.या राज्यस्तरीय उन्हाळी शिबिरात मुलांनी व पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संयोजिका योगगुरु अर्चनाताई सोनार यांनी सांभाळले.शेवटी आभार प्रदर्शन दिनेश येवले यांनी केले.