pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी यांच्या निधनाने उरण पूर्व विभागावर शोककळा

0 1 2 1 1 2

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24

उरण पूर्व विभागातील काँग्रेसचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा रायगड जिल्हा परिषदेतील पक्ष प्रतोद
बाजीराव दामा परदेशी(60) यांचे गुरुवारी दिनांक 24/8/2023 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून,त्यांचे कुटुंबीय व चिरनेर वासियांसह संपूर्ण उरण पूर्व विभागावर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.

गावागावात धडाडीने विकासकामे करणारे आणि संयमी नेतृत्व,अजात शत्रू मानले जाणाऱ्या बाजीराव परदेशी यांच्या निधनाची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली असून त्यांच्या चिरनेर येथील चिरनेर – खारपाडा महामार्गावरील निवासस्थानी व चिरनेर येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्य दर्शन घेण्यासाठी त्यांचे नातेवाईकांसह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2