pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेफर इंटरनेट डे’ निमित्त विशेष कार्यशाळा संपन्न

0 4 0 7 5 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.10

जिल्हा सूचना विज्ञान केंद्र (NIC) यांनी ‘सेफर इंटरनेट डे’ निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन, येथे आज इंटरनेटचा सुरक्षित व जबाबदारीने वापर याबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. इंटरनेटचा सुरक्षित वापर, सायबर सुरक्षा आणि ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शासकीय कामकाजात तसेच वैयक्तिक स्तरावर इंटरनेट वापरताना घ्यावयाची काळजी आणि तांत्रिक बाबींबाबत माहिती देणे हा आहे. सर्व शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सूचना विज्ञान केंद्र यांनी केले आहे.
या कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकरी शशिकांत हदगल, प्रा. संदीप काळे, जिल्हा सूचना विज्ञान केंद्राचे भूषण लोखंडे, रामेश्वर भोसले, दिपेंद्र जयस्वाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 7 5 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे