pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

महाविकास आघाडीच्या उमेदवारांना वाढता पाठिंबा.

महाविकास आघाडीचेच उमेदवार बहुमताने निवडून येणार असल्याची सर्वत्र चर्चा.

0 4 0 4 1 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 4

नवघर जिल्हा परिषद गटातून उभे असलेल्या प्रेरणा कुणाल पाटील, भेंडखळ पंचायत समिती गणातून उभे असलेले उमेदवार दीपक सुरेश भोईर,नवघर पंचायत समिती गणातून उभे असलेले उमेदवार परेश धनाजी ठाकूर हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून या तिन्ही उमेदवारांची निशाणी मशाल आहे.या तिन्ही उमेदवारांनी आपापल्या परिसरात, विभागात जोरदार प्रचार सुरू केला असून गावोगावी घराघरात जाऊन नागरीकांशी,जनतेशी उत्तम संवाद साधत आहेत. या प्रचारादरम्यान जनतेचाही उत्कृष्ट प्रतिसाद पाहायला मिळत असून या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढत आहे. दिवसेंदिवस हा पाठिंबा वाढतच चालला आहे.जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे व जनतेच्या समस्या सोडणारे हे उमेदवार असल्याने नागरिकांनी या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे.प्रेरणा पाटील, दीपक भोईर, परेश ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून या उमेदवारांचा विजय हा निश्चित मानला जात आहे.गावोगावी घरोघरी नागरिक, ग्रामस्थ महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे प्रेमाने आपुलकीने स्वागत करीत आहेत.त्यांना जिंकून येण्यासाठी आशीर्वाद देत आहेत. आता मतदान काही दिवसावर आले असताना प्रचार रंगात आलेला आहे. नवघर गावात झालेल्या प्रचारात प्रेरणा पाटील,परेश ठाकूर व भेंडखळ, हनुमान कोळीवाडा आदी विविध गावा मध्ये दीपक भोईर यांनी केलेल्या प्रचारात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.प्रेरणा पाटील, दीपक भोईर, परेश ठाकूर हे बहुमताने निवडून येतील अशी चर्चा संपूर्ण उरण तालुक्यात सर्वत्र सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 4 1 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे