pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

0 1 1 8 3 4

जालना/प्रतिनिधी,दि.19

केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि.19 जुन 2023 रोजी वाहनाने भोकरदन येथून सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठकीस उपस्थिती. भोकरदन येथील निवासस्थानी मुक्काम करतील.
मंगळवार दि.20 जुन रोजी सकाळी 9.30 वाजता वाहनाने भोकरदन येथून बदनापूर कडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता बदनापूर येथे @9 वर्षे मोदी सरकारचे महासंपर्क अभियान कार्यक्रमास उपस्थिती. वेळेनूसार बदनापूर येथून व्यापारी संमेलनास उपस्थिती. भोकरदन येथील निवासस्थानी मुक्काम करतील.
बुधवार दि.21 जुन रोजी सकाळी 6.30 वाजता योग दिन समारंभास उपस्थिती (स्थळ- ज्वाला लॉन्स, जालना), सकाळी 9.30 वाजता एडीईपीपी शिबीराचे उदघाटन करतील (स्थळ – जेपी मुलींची शाळा, जालना), दुपारी 12.30 वाजता भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ कार्यकर्ता बैठकीस उपस्थिती (स्थळ –मुक्तेश्वर हॉल).

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4

Related Articles