pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

27 डिसेंबर रोजी ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ जागेवर निवड संधीचे आयोजन 

0 1 7 4 0 8

जालना/प्रतिनिधी,दि.26

नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने महिन्याच्या प्रत्येक बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्याकडून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना  येथे बुधवार दि. 27 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी युवक-युवतींनी या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले आहे.
मातोश्री स्किल डेव्हल्पमेंट सेंटर प्रा. लि. जालना यांची बी.एस्सी/बी.सी.ए/बी.ई कॉम्प्युटर उत्तीर्ण उमेदवारांसाठी प्रोजेक्ट समन्वयक/वेब डेव्हलपमेंट प्रशिक्षक उमेदवारांसाठी 5 पदे, तर कोणतीही पदवी उत्तीर्णांसाठी समुपदेशक पदाकरिता 2 पदे, ब्युटी पार्लर / शिवणकाम प्रशिषक पदाकरिता करिता दहावी/बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 4 पदे, तर इलेक्ट्रॉनिक/इलेक्ट्रिशन पदासाठी आय टी आई / डिप्लोमा/बी.ई. उत्तीर्ण उमेदवारांसाठी 4 आहेत. तसेच श्री रेणुकादेवी नागरी पतसंथा जालना यांची व्यवस्थापक, क्लार्क, कॅशिअर पदासाठी बी.कॉम उत्तीर्ण उमेदवारांकरिता 11 पदे, तर एम.बी.ए मार्केटिंग उत्तीर्ण उमेदवारांसाठी मार्केटिंग प्रतिनिधी पदाकरिता 3 पदे, तर दहावी/ बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पिग्मी एजंट पदासाठी 5 पदे असे एकूण 34 पदाकरीता मागणीपत्र प्राप्त झाले असून नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.
जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिककरून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर-14 (2023-24) जालना याची निवड करावी. उद्योजक / नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता इत्यादी कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून बुधवार दि. 27 डिसेंबर 2023, रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना  येथे उपस्थित रहावे, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे