महादेव – नंदी लिंग प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन…

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.18
येथील महादेव मठाचे मठाधिपती सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज हे शिवैक्य झाल्यानंतर श्री ष. ब्र.१०८ सद्गुरु
शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांचा पट्टाअभिषेक करून त्यांना गादीवर बसविण्यात आले. त्यांच्या पट्टाअभिषेक सोहळ्याला दिनाक २० रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. प्रथम पट्टाअभिषेक वर्धापन दिन व महादेव व नंदी लिंग स्थापना सोहळ्या निमित्त महादेव मठामध्ये दिनांक १९ ते २१ या कालावधीमध्ये विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
आहे.
या सोहळ्यास श्री ष. ब्र.१०८ वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज,श्री ष.ब्र.१०८ वेदांताचार्य सद्गुरु दिगंबर शिवाचार्य महाराज,श्री ष. ब्र.१०८ सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज,श्री ष. ब्र.१०८ सद्गुरु विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज,श्री ष. ब्र.१०८ सद्गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज,श्री ष. ब्र.१०८ सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य महाराज,श्री प. पू. महंत गोपाळगीर महाराज,
श्री प.पू. बालयोगी व्यंकटस्वामी महाराज, महंत योगीराज बापू,विरागी दास महाराज, श्री भि.बा.मानखेडकर गुरुजी,श्री शिवाप्पा गुरुजी,श्री अनिल स्वामी व रामदास स्वामी सुमठाणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दिनाक १९ रोजी सकाळी ७ वाजता ध्वजारोहण,
८ वा.संजीवन समाधीस रुद्राभिषेक,१०वा. परमरहस्य व सिद्धेश्वर महाराज पारायण,सायंकाळी ५ वा. महाप्रसाद,६ वा. शिवपाठ,रात्री ८ वा. शि.भ. प. नागेश स्वामी कुरुंदवाडीकर यांचे शिवकिर्तन होणार आहे.
तसेच
दिनाक २० रोजी सकाळी ९ वा. महादेव व नंदी यांची मिरवणूक, दुपारी १२ वा. श्री श्री श्री १०८ वेदांताचार्य शिवाचार्यरत्न सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा होणार असून दुपारी २ वा. महाप्रसाद, सायंकाळी ६ वा. शिवपाठ, रात्री ८ वा. शि.भ. प. शिवशरनजी रटकलर गुरुजी यांचे शिवकीर्तन होणार आहे.
तसेच
दिनाक २१ रोजी सकाळी १० वा उपस्थित गुरुमाऊलीच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.त्यानंतर ११ वा. श्री ष. ब्र.१०८ सद्गुरु वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.किर्तन झाल्यानंतर दुपारी १ वा.महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असून वरील सर्व आयोजीत कार्यक्रमास पंचक्रोशीतील भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन हदगाव येथील
वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.