pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

गुरु संतोषजी रांका बाबा यांचा ‘लग्नाचा वाढदिवस’ उत्साहात साजरा

0 1 2 1 1 1

वृत्तसंकलकःआत्माराम ढेकळे,दि.8

पुणे — येथील गंगाधाम परिसरातील सर्वपरिचित गुरु संतोषजी रांका बाबा व गुरुमाऊली सौ.नीताजी रांका यांचा “लग्नाचा वाढदिवस “नुकताच साजरा करण्यात आला.याप्रसंगी अनेक चाहत्यांनी ,भाविकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
ॐ विश्व नरेंद्र या वास्तुतील ॐसाई विश्वनाथबाबा मंदिराच्या ठिकाणी अनेक भाविकजनांनी गुरु संतोषजी रांका बाबा व गुरुमाऊली सौ.नीताजी रांका यांच्या लग्नाच्या एकविसाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.या वाढदिवस प्रसंगी भाविक ईशा पाटोळे नी रांगोळीतुन उभयतांची आकर्षक प्रतिमा साकारली.तर गायक शिवसहाय सिंह व भाविक सहकारी यांनी साईबाबा ,नरेंद्रनाथबाबा,विश्वनाथबाबा यांचेवर आधारीत गीत व भजन मधुर आवाजात सादर केले. तसेच या कार्यक्रमात अध्यात्मज्ञानप्रसारक आत्माराम ढेकळे यांनी सर्वसामान्यांच्या जीवनातील अडी-अडचणी दुर करणे संबधी मार्गदर्शन करणाऱ्या बाबांना शुभेच्छा व्यक्त करुन सपत्नीक बाबा व गुरुमाऊलीचे आशिर्वाद घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 1