pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

हम सब एक है!या जयघोषात संविधान सन्मान रॅली.

0 1 7 4 1 4

टेंभुर्णी/ सुनिल भाले,दि.27

टेंभुर्णी शहरातील, नालंदा स्मारक समिती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने आज २६ नोव्हें रोजी भारतीय संविधान सन्मान रॅली चे आयोजन करण्यात आले होते, सर्वप्रथम नालंदा बुद्ध विहाराच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात सर्व उपस्थित शहरवासीयांनी भारतीय संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले, तसेच २६/११च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या भारत मातेच्या विर सुपुत्रांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले, टेंभुर्णी शहराच्या प्रथम नागरिक सरपंच सुमनताई म्हस्के यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान सन्मान रॅली चे उद्घाटन करण्यात आले, रॅलीत भव्य अशा सुशोभित रथावर “संविधान पुस्तक, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली, शहरातील प्रमुख मार्गावरून हम सब एक है, भारतीय संविधान चिरायू होवो, भारतीय संविधानाचा विजय असो, अशा घोषणांच्या जयघोषात मोठ्या उत्साहात, शांततेत, शिस्तित, संविधान सन्मान रॅली काढण्यात आली.या रॅलीत टेंभुर्णी शहरातील सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची झलक दाखवली, आजच्या रॅलीत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभागी होऊन आपण “सर्व प्रथम भारतीय आहोत” ही भावना जागृत केली, दिनकर ससाणे यांनी प्रास्ताविक भाषणात संविधानाने भारतीय नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्क व अधिकारा विषयी मार्गदर्शन केले,रॅलीत. सरपंच सुमनताई म्हस्के,रामधन पाटील कळंबे, गौतम म्हस्के दिपक बो-हाडे, लक्ष्मणराव शिंदे,रावसाहेब अंभोरे,पी.के.वाघमारे, किसनराव मघाडे बाबुराव मघाडे, सतिष चंदनशिवे,शेख नसिम शेख अमीर,भिखनखॉ पठाण, संजय राऊत, फैसल चाऊस,अलकेश सोमाणी, किशोर कांबळे, पांडुरंग बोरसे, धनराज देशमुख, संतोष पाचे, अब्दुल नबी, गणेश तांबेकर, विक्रम उखर्डे,अरूण मोकळे, ज्ञानेश्वर उखर्डे, बाळुभाऊ देशमुख, दिपक जमधडे,राम गुरव, रवि खरात,शारेक सिद्दिकी,राजु गोफणे, सिताराम गोफणे, किरण मोकळे,गोविंद जाधव,या मान्यवरांचा सहभाग होता, रॅलीत रमाबाई महिला मंडळ चा सहभाग लक्षणीय होता, भारतीय संविधान सन्मान रॅली चे यशस्वी आयोजन करण्यासाठी नालंदा स्मारक समिती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती चे पदाधिकारी एस.पी.वाघमारे सर,जगन मघाडे, प्रदिप मघाडे,राजु मघाडे, दिनकर ससाणे सर,राजु म्हस्के, विजय म्हस्के,विलास पैठणे, गौतम कांबळे वसंता छडिदार, कपिल जाधव,किरण कासारे, के.टी.चंदनशिवे, आकाश चंदनशिवे, रंजित जाधव, अनिल गायकवाड, विलास पैठणे,पप्पू साबळे,विकास पैठणे, स्वराज वर्शिळ, अविनाश गवई, पप्पू शिंदे,बाळु शिंदे, विशाल गवई, मिलिंद म्हस्के, राहूल बनसोडे, राहुल कांबळे, गौतम गायकवाड, गौतम छडिदार,आदींनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे