मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव निमित्त महिलांसाठी स्वसुरक्षा प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ

जालना,/प्रतिनिधी,दि. 8
मराठवाडा विभागातील सर्व जिल्हयामध्ये दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मराठवाडा मुक्ती संग्रामास यावर्षी 75 वर्षे पुर्ण होत आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना मार्फत दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे महिलांसाठी स्वसंरक्षण व सुरक्षेचे , आर्थिक स्वावलंबनाचे प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाले.
याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, शिक्षणाधिकारी मंगल धुपे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्रा.डॉ. भुजंग डावकर, प्रा. डॉ. संजय शेळके, मुख्याध्यापिका, देवगिरी इंग्लीश स्कुल, गायत्री सोरटी, क्रीडा संघटक पी.जे. शेख चाँद, प्रमोद खरात, वनिता पिंपळे आदींची उपस्थित होते.
उद्घाटनपर मार्गदर्शन करतांना अप्पर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी महिलांनी स्वसंरक्षण व सुरक्षेचे आणि आर्थिक स्वावलंबनाचे धडे घेऊन मुलांवर चांगले संस्कार घडवावे. जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन करतांना सदर उपक्रमातून महिलांनी, तरूणींनी बोध घेऊन आर्थिक व स्व सुरक्षेत स्वावलंबी व्हावे याबाबत प्रतिपादन केले तर शिक्षणाधिकारी मंगल धुपे यांनी महिलांनी आर्थिक स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक असून सद्याच्या वातावरणात महिलांनी स्वसुरक्षेच्या बाबतीतही स्वावलंबी होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
महिलांसाठी स्व संरक्षण व सुरक्षेचे प्रशिक्षण शिबीरार्थीना प्रा. डॉ. हेमंत वर्मा, सचिन आर्या, विजय गाडेकर, ज्ञानेश्वर मोरे, दिव्या गायकवाड, राणी पळसकर हे या प्रशिक्षण शिबीरास मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षण शिबीरामध्ये जिल्हयातील नर्सिंग महाविद्यालय, विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थींनीसह युवतींनी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्तावीक जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे यांनी केले. आभार प्रदर्शन सोपान शिंदे यांनी केले. शिबिराच्यास यशस्वीतेसाठी क्रीडा मार्गदर्शक, संतोष वाबळे, वरिष्ठ लिपीक संतोष प्रसाद, सोपान शिंदे, राहुल गायके, हारूण खान आदी परिश्रम घेतले.