इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना सेवानियम लागू करावेत – मराठवाडा शिक्षक संघाची मागणी

जालना/प्रतिनिधी,दि.16
राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील प्रशिक्षित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभण्यासाठी सेवानियम लागू करावेत अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष.श्री रमेश आंधळे व जिल्हा सचिव.श्री संजय येळवंते. यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. याशाळेवर हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. या शिक्षकांच्या सेवेला ना संरक्षण आहे ना यथास्थिती वेतन आहे. त्यामुळे या शाळेत कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य व सामाजिक प्रतिष्ठेचा अभाव आहे. आर्थिक विवंचनेत असलेला उपाशी पोटी आणि सेवासुरक्षा नसल्याने असुरक्षिततेची भावना असलेला शिक्षक ही या राज्याची शोकांतिका आहे. या शाळेवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमधे असंतोष निर्माण होत आहे. मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी. एस. घाडगे व व्ही.जी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांच्या नेतृत्वाखाली यासाठी प्रचंड आंदोलन उभारण्यात येणार आहे.दर्जेदार शिक्षणासाठी राज्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेतील शिक्षकांना सेवासंरक्षण व प्रचलित नियम व कायद्यानुसार वेतन देण्यात यावे आणि संघर्ष व अप्रिय घटना टाळाव्यात अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे व जिल्हा सचिव श्री संजय येळवंते यांच्यासह केंद्रीय जिल्हा मार्गदर्शक प्रा.डाॅ.मारोती तेगमपुरे उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य प्रेमदास राठोड,आरेफ कुरेशी,उपाध्यक्ष जगन वाघमोडे, भीमाशंकर शिंदे, कार्याध्यक्ष फरकूंद अली सय्यद, कोषाध्यक्ष नारायण मुंडे,प्रद्युम्न काकड, हकीम पटेल, भगवान धनगे, गणेश चव्हाण, तुकाराम पडघन, संजय चव्हाण, गणेश मेहेत्रे, राधेश्याम चौधरी, शिवहरी कांयदे, विजयकुमार खरात, आनंद वाघ, जनार्दन कुदर, सुधाकर डोईफोडे, बबन लंके यांनी राज्याचे मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.