pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

26 नोव्हेंबर संविधान गौरव दिन जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा येथे उत्साहात संपन्न

0 1 7 4 0 8

विशेष प्रतिनिधी/जितेंद्र गाडेकर,दि.28

जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा,केंद्र कोशिंबी,ता. भिवंडी येथे भारतीय संविधान गौरव दिन जल्लोषात संपन्न झाला.
भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त भव्य भारतीय संविधान सन्मान रॅली ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत काढण्यात आली. सदर रॅली मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी,ग्रामस्थ, पालक सहभागी झाले होते. संविधान घोषवाक्याच्या जोरदार घोषणा देऊन संविधानाचा सन्मान व प्रचार करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातात संविधान विषयक घोषवाक्यांचे बॅनर, पोस्टर्स, महामानव संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा,भारतीय संविधान होते. सन्मान रॅलीला भव्य स्वरूप प्राप्त झाले होते

भारतीय संविधान निर्माते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव यांचे हस्ते पुष्पहार अर्पण तर ग्रामस्थ महिला सुनिता सोनावणे यांचे हस्ते दीपप्रज्वलन करून व भारतीय संविधान प्रतीला पुष्प अर्पून वंदन करण्यात आले.भारतीय संविधान उद्देशिकेचे विद्यार्थांनी सामुहिक वाचन केले

मुख्याध्यापक अशोक गायकवाड यांनी भारतीय संविधान या विषयावर प्रबोधनपर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी सांगितले की भारतीय संविधान हे जगातील श्रेष्ठ असे संविधान असून आपल्या देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. भारतीय संविधान हा आपला श्वास आहे. आपले अधिकार व हक्क अबाधित ठेवायचे असतील तर भारतीय संविधानाचे आपण रक्षण केले पाहिजे असे अवाहन विद्यार्थांना केले
ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले व संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांना संविधान उद्देशिका प्रत व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक अशोक गायकवाड यांनी यथोचित स्वागत सन्मान केले विद्यार्थांच्या वकृत्व स्पर्धा, निबंध, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या

ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव यांनी विद्यार्थांना चाॅकलेट वाटप करून कार्यक्रम गोड केला.
मुख्याध्यापक अशोक गायकवाड यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे