जाफराबाद तालुक्यातील मोहारा ते जालना (मार्गे
पिंपळगाव कड, बरंजळा साबळे, नळणी, बरड, नळणी चौफुली, समर्थनगर, नळणी,जवखेडा ठोंबरे, केदारखेडा, राजुर -जालना बस सेवा सुरू करण्यात यावी, या
मागणीसाठी भोकरदन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी परिवहन महामंडळाकडे वारंवार मागणी व आंदोलने केली. अखेर या मागणीला यश आले असून परिवहन महामंडळाने दिलेल्या आश्वासनानुसार १६ जून
सोमवारपासून बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
सदरील बस सेवा सुरु करावी ही मागणी मागील ३५ वर्षांपासूनची होती. मात्र कोणीही पाठपुरावा करण्यास धजत नसल्याने मागणी पुर्ण होत नव्हती. मात्र
जवखेडा ठोंबरे तरुण तथा शिवसेना उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांनी मनात घेवून व शिवसेनेच्या वरिष्ठांच्या सहकार्याने बससेवा सुरु करण्यासाठी
पाठपुरावा सुरु केला. वेळप्रसंगी आंदोलनेही केली. शेवटी मोठ्या परिश्रमानंतर आज १६ जुनपासून साक्षात बससेवा सुरु होवून बस गावात आली.
त्यामुळे रस्त्याने येणार्या सर्व गावात बसचालक व वाहकांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
सदरील बस सकाळी ८.५५ माहोरा ते जालना (मार्गे पिंपळगाव कड- बरंजळा साबळे-
नळणी बरड- नळणी चौफुली- समर्थ नगर नळणी- जवखेडा ठोंबरे- केदारखेडा- राजुर-जालना, दुपारी २.५५ जालना (संबंधित महामार्गावरून) ते माहोरा निघेल, अशी
बसची वेळ आले. आज सदरील बस जवखेडा ठोंबरे गावात येताच शिवसेना उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांच्यासह सरपंच लक्ष्मण ठोंबरे, माजी
सरपंच बाबुराव ठोंबरे, ग्रामसेवक व्ही. एस. सोनुने, शिवसेना विभागप्रमुख फारूक पठाण, युवासेना विभागप्रमुख विलास करतारे, परमेश्वर ढवळे, डॉ.भगवान
ठोंबरे, दिनकर (फौजी),सुयोग ठोंबरे, बालाप्रसाद ठोंबरे, भगवान ठोंबरे,विलास करतारे, वाल्मीक ढवळे, नारायण ठोंबरे, अंकुश ठोंबरे, शिवाजी
ठोंबरे, राजू ठोंबरे, भागवत ठोंबरे,नारायण ठोंबरे, अण्णा ठोंबरे, बबन ठोंबरे, सुनील ठोंबरे, शिवाजी ठोंबरे,संतोष ठोंबरे, शरद ठोंबरे, रामेश्वर ठोंबरे, शेषराव ठोंबरे,जना ठोंबरे, बाबुराव ठोंबरे, गजानन ठोंबरे व इतर
गावकरी उपस्थित होते.यावेळी एस टी बसचे वाहक एम. एस. राठोड, चालक बी. एफ. पगारे यांचा जवखेडा
ठोंबरे गावात गावकर्यांनी एकत्रित येवून सत्कार केला.