pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

डुकरी पिंपरी येथे महाराष्ट्र कृषी दिन….बळीराजाचा सन्मानाचा दिवस…

0 1 7 4 1 5

जालना/प्रतिनिधी, दि.1

जालना जिल्हातील चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था नजिक पांगरी संचलित राजर्षी छञपती शाहू महाराज विद्यालय डुकरी पिंपरी,ता.जि.जालना या शाळेत एक लाख एकर जमीन वाटणारा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन म्हणजे ‘महाराष्ट्र कृषी दिन’साजरा करण्यात आला.. राज्याचे माजी मुख्यमंञी हरित क्रांतीचे प्रणेते म्हणजे वसंतराव नाईक मुख्यमंञी पदाची खुर्ची सलग ११ वर्षे स्वत:च्या ताब्यात ठेवून महाराष्ट्रात हरित क्रांती घडवणाऱ्या यांची जयंती शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी उपस्थित शाळेचे शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद श्रीमती.एस.आर.कुलकर्णी,वाय.बी.मदन,डी.एन.सोनकांबळे,पी.पी.नागरे,श्रीमती.ए.बी.देशपांडे,एल.बी.जाधव,आर.एस.ठाकरे,श्रीमती.एम.ए.खरात. व विद्यार्थीं व विद्यार्थींनी उपस्थित होते च्या वतीने ही त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक सी.जी.वाघमारे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.ते बोलताना म्हणाले की कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (१ जुलै) ‘महाराष्ट्र कृषी दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये सांगितले होते. वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. ‘शेती आणि शेतकरी’ हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते . शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात ‘कृषी विद्यापीठां’ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला.
राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. ‘रोजगार हमी योजने’तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण ‘कृषी दिन’ म्हणून साजरा करतो.तसेच शाळेचे सहशिक्षक सांस्कृतीक विभागप्रमुख वाय.बी.मदन यांनी छान असे सुञसंचालन व आभारप्रदर्शन केले व “कृषी दिन”च्या शुभेच्छा दिल्या…!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे