वीरशैव लिंगायत वाणी स्मशानभूमीतील समाधीची विटंबना
विटंबना करणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यासाठी वीरशैव लिंगायत वाणी समाज बांधव आक्रमक ● तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी,पोलीस स्टेशन यांच्यासह आमदार विजयसिंह पंडित यांना दिले निवेदन

गेवराई/प्रतिनिधी,दि.24
गेवराई शहरातील गोविंदवाडी रोड लगत वीरशैव लिंगायत वाणी समाजाची स्मशानभूमी असून या स्माशनभुमीमध्ये असलेल्या एका समाधीस्थळाची विंटबना झाल्याची घटना घडली आहे.
या स्मशानभुमीमध्ये कै. सिध्दलींगअप्पा कोंडाअप्पा बेदरकर यांच्या समाधीची अज्ञात व्यक्ती कडुन नासधुस करून समाधी ची विटंबना करण्यात आली आहे.
या घटनेच्या अनुषंगाने आज गेवराई शहरातील वीरशैव लिंगायत वाणी समाज बांधवांनी एकत्र येऊन अज्ञात व्यक्ती विरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यासाठी व वीरशैव लिंगायत वाणी समाजाच्या स्मशानभुमी मधील समाधीसाठी सरंक्षण देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज दि. 24 वार सोमवार रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी गेवराई, पोलीस निरीक्षक गेवराई पोलीस स्टेशन,मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद गेवराई तसेच गेवराई तालुक्याचे आमदार विजयसिंह पंडीत यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच स्मशानभूमीला संरक्षण देण्यात यावे अशा प्रकारची मागणी यावेळी वीरशैव बांधवांच्या वतीने करण्यात आली. याप्रसंगी गणेशअप्पा कापसे, अनिलअप्पा शेटे, वैजिनाथअप्पा मिटकर, शाम रुकर, सुनील संभाहारे, योगेश कापसे, सुरेंद्र रुकर, रविशंकर वाडकर, दिपक कापसे,प्रवीण राजुरे, नंदकिशोर कापसे, अशोक फुलशंकर, अनिल सोसे, अमोल संभाहारे यांच्यासह गेवराई येथील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.