pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

दामाजी हरी पाटील यांचे दुख:द निधन

0 1 1 8 2 2

.उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18

उरण तालुक्यातील पागोटे गावचे रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते दामाजी हरी पाटील यांचे दिनांक 14 जुलै 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 81 होते. शांत संयमी व मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या पश्चात त्यांना 3 मूले आणि 7 नातवंडे असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. दामाजी पाटील हे पागोटे गावचे उपसरपंच पदावर कार्यरत असताना त्यांनी अनेक विकासकामे केली. गोर गरिबांची अनेक प्रश्न सोडविली.गोरगरिबांच्या व कुटूंबांच्या नेहमी अड़ी अडचणीला धावून जाणारे दामाजी पाटील यांचे अल्पशा आजाराने दुख:द निधन झाल्याने पाटील कुटुंबीय व ग्रामस्थांवर शोककळा पसरली आहे. अंतिम संस्कारावेळी खूप मोठा जनसमुदाय उपस्थित होता.कै.दामाजी हरी पाटील यांची दशक्रिया विधी रविवार दि 23/7/ 2023 रोजी सकाळी 8 वाजता उरण माणकेश्वर येथे असून उत्तर कार्य (बारावा) मंगळवार दि 25/7/2023 रोजी त्यांच्या राहत्या घरी पागोटे येथे केले जाणार आहे. या दुःखद प्रसंगी कोणत्याही प्रकारचे दुखवटे स्विकारले जाणार नाहीत अशी माहिती कै. दामाजी पाटील यांचे सुपुत्र अडव्होकेट भार्गव पाटील(माजी सरपंच पागोटे )यांनी दिली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *