जालना तालुक्यातील गोंदेगांव येथील सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनलयामध्याध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदेश नुसार वाचन संकल्प हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ वाचन करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री वाघ, शिक्षक वृंद तसेच शाहुराव खंदारे, विलासराव दाभाडे, सुनिल खंदारे, सुधाकर खंदारे, शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, सदस्य, पत्रकार, ग्रंथालयाचे अध्यक्ष रामदास निकाळजे, ग्रंथपाल, प्रगती निकाळजे आदींची उपस्थिती होती.