राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यात 484 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

जालना/प्रतिनिधी,दि.27
जिल्ह्यात कोटपा ॲक्ट 2003 : सिगारेट ॲन्ड टोबॅको ॲक्ट 2003 मधील कलमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येते. तरी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जालना जिल्ह्यात 2023-24 वर्षामध्ये 484 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करुन एकुण 17 हजार 445 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सदस्य तथा पोलिस अधिक्षक अजयकुमार बंन्सल, सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरात विविधस्तरावर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्यात आली. कोटपा-2003 कायद्याची अंमलबजावणी, अवैध तंबाखु, सिगारेट विक्रेत्यांवर कारवाई, शालेय विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन, तंबाखू सेवन करणाऱ्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले. असे जिल्हा शल्यचिकित्सक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.