pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

वीर वाजेकर महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा

0 3 8 6 5 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13

भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस. आर.रंगनाथन यांचा जन्मदिवस दि. १२ ऑगस्ट संपूर्ण भारतात राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर ए.एस.सी. कॉलेज फुंडे येथे राष्ट्रीय ग्रंथपाल दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागातर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सदर पुस्तक प्रदर्शनात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाचावीत असे पुस्तके प्रदर्शित करण्यात आली होती. पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करून या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक लायन मिलिंद पाटील यांनी केले. याप्रसंगी मिलिंद पाटील यांचे स्वागत गुलाब पुष्प आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवलेले बुकमार्क देऊन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर यांनी केले.
“शालेय जीवनात ज्याने ग्रंथालयाचा वापर केला आहे त्यालाच ग्रंथांचे खरे महत्त्व कळते. या प्रदर्शनात मांडलेली सगळीच पुस्तके महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वाचावीत आणि त्यातून प्रेरणा घ्यावी अशी आहेत.” असे मत मिलिंद पाटील यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी देखील याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील प्रा. संतोष देसाई व प्रा. तन्वी कोळी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उद्घाटनाचे प्रास्ताविक आणि आभार महाविद्यालयाच्या ग्रंथपाल सुप्रिया नवले यांनी मानले.
या पुस्तक प्रदर्शनाच्या आयोजनामध्ये ग्रंथालय विभागातील सहायक कमल बंगारे व नर्मदा खरपडे यांनी परिश्रम घेतले. दिवसभरात महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागातील प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन पुस्तक प्रदर्शन यशस्वी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 6 5 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे