नांदेड येथे काढुन पोलिस स्टेशन वजीराबाद येथे दिव्यांग कायदा व दप्तर याचा अहवाल मिळनेबाबत पोलिस स्टेशन वजिराबाद दुसरे सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने निवेदन

नांदेड/प्रतिनिधी,दि.13
दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दिव्यांग दिनी आमच्या तक्रारीन्वये.सन २०१५ पासुन ते आजपर्यंतचे आमचे विविध निवेदनान्वये.दिव्यांग व्यक्तींसाठीचे अधिनियम आरपीडब्ल्यु डी ॲक्ट २०१६ तील विविध कलमान्वे गुन्हा नोंद करण्यासाठी मा.विशेष पोलिस महानिरीक्षक साहेबनांदेड
मा.पोलीस अधिक्षक साहेब. नांदेड यांना सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी दुसरे निवेदन सादर
दिव्यांगांच्या विविध शासन निर्णयीत न्याय मागण्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने आपणास व संबंधित शासकीय विभागास निवेदने देऊन आंदोलने उपोषणे करून मोर्चे काढूनही अद्याप केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या द्वारे आजपर्यंत निर्गमित करण्यात आलेल्या दिव्यांगांच्या कल्याणासाठीच्या विविध शासन निर्णयांची व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी न करता नांदेड शहर व संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांपासून वंचित ठेवणा-या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यावर आरपीडब्ल्यु डी ॲक्ट २०१६ व दफ्तर दिरंगाई कायद्यासह सेवा हमी कायद्या अंतर्गत तत्काळ गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी यासाठी आम्ही सर्व शेकडो दिव्यांगांनी आपल्या नावासह सह्य करून आपणास दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी जागतिक दिव्यांग दिनी रितसर तक्रार दाखल केली होती परंतु त्या तक्रारीच्या अनुषंगाने आपल्याकडून काय कारवाई करण्यात आली आहे हे आम्हाला अद्याप कळले नाही तसेच संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी देखील आमच्या निवेदनांची कुठलीच दखल न घेतल्यामुळे आम्ही संतप्त शेकडो दिव्यांग बांधव आणि भगीनी गणराज्य दिनी दिनांक २६ जानेवारी २०२५ आणि दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी परत एकदा आक्रोश मोर्चा काढून संबंधित सर्वच शासकीय कार्यालयात तिवृ स्वरूपाचे विद्रोही आंदोलन करणार आहोत तसेच गणराज्य दिनी ध्वजारोहण करण्यासाठी आलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींसह मंत्रीगण, शासकीय अधिकारी कर्मचारी यांना घेराव घालणार आहोत तरी कृपया मा.साहेबांना कळकळीची नम्र विनंती आहे की कृपया आम्ही दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण नेमकी काय कारवाई केली आहे त्याचा अहवाल आम्हाला देण्यात यावे जेणेकरून आम्हाला न्यायालयात दाद मागता येईल.
यासाठी सकल दिव्यांग संघटनेच्यावतीने दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी पोलिस निरीक्षक साहेब वजीराबाद नांदेड येथे निवेदन सकल दिव्यांग संघटनेचे
राहुल सिताराम साळवे
अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य नांदेड.
चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर संस्थापक अध्यक्ष दिव्यांग, वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र राज्य.नांदेड
आदित्य सारंग पाटील
संस्थापक उपाध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य.
देविदास बद्देवाड तालुका अध्यक्ष दिव्यांग आघाडी मुखेड
असे प्रसिध्दी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने देण्यात आले