सत्यशोधक विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.17
मानव विकास व पूर्णनिर्माण संशोधन संस्था छत्रपती संभाजीनगर संचालित सत्यशोधक विद्यालय गोषेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना येथे डॉ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. ग्रंथालयातील पुस्तकांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेत सहभाग नोंदविला.कायगाव येथील वर्ग 10 वी तील विद्यार्थिनी स्नेहा संतोष खोडके हिला महावाचन निबंध अंतर्गत जिल्ह्यातून मिळालेल्या पुस्तकांचे यात मला आय ए एस व्हायचे, स्त्री कर्तुत्ववान, मीच माझे आयुष्य घडवणार, साजसुधारक माहिती, गणिताची जादू, अग्निपंख, या पुस्तकांचे वाचनही करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष एकनाथ खोडके यांची उपस्थिती लाभली तसेच त्यांचा स्नेहा मुली सोबत त्यांचा सत्कारही करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष सुनील वाकेकर , यासाठी संस्थेच्या सचिव श्रीमती जयश्री बनकर यांचे मार्गदर्शन लाभले. मोठ्या पदावर कार्यरत व्हायचे स्वप्न बघा आणि ते सत्यात उतरवा अशी आठवण सुनील वाकेकर यांनी करून दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक इफरोज पठाण हे होते. सूत्रसंचालन निलेश कंकाळ तर आभार श्रीकांत बंगाळे तर वाचनाचे महत्व दिनेश मगरे व दत्तू सुलताने यांनी सांगितले. ग्रंथालय विभागाचे शुभम मोरे तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.



