pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अनधिकृत चायनीज (चिनी बनावटीच्या) वजन काटे यांच्या विक्री व वापरावर बंदी

0 1 7 4 1 4

जालना/प्रतिनिधी,दि.25

वैध मापन शास्त्र यंत्रणेमार्फत वजने, मापे व तोलन उपकरणे यांच्या अचुकतेबाबतची पडताळणी केलेली वजने व मापे व तोलन उपकरणे उपयोगकर्त्यानी वापरणे कायद्यान्वये बंधनकारक आहे. तसेच वजने व मापे यांचा वैध विक्री परवाना असलेल्या परवानाधारकाने वजने, मापे व तोलन उपकरणे यांची विक्री करणे आवश्यक आहे. असे असताना देखील काही व्यापारी विविध देशातुन आयात केलेले (चिनी व बनावटीचे) किंवा इतर राज्यातुन आणलेले इलेक्ट्रॉनिक्स काटे अनधिकृत व्यक्ती त्याचे स्टिकर वजन काटयांना लावून अनधिकृतपणे विक्री करत आहेत.
सदरचे इलेक्ट्रॉनिक्स काटे अप्रमाणित असल्यामुळे त्यांची विक्री अथवा उपयोगकर्त्याने वापर करणे बेकायदेशीर आहे. अप्रमाणित इलेक्ट्रॉनिक्स काटयाची विक्री अथवा वापर केल्याचे आढळून आल्यास वैध मापन शास्त्र अधिनियम 2009 व त्याअंतर्गतच्या नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे अप्रमाणित वजन काटयाची विक्री अथवा व्यवहारामध्ये उपयोग करु नये,  असे आवाहन उपनियंत्रक, वैध मापनशास्त्र आर.डी. दराडे  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे