जालना : वर्षभरानंतर जालना गणेश फेस्टीव्हल होत आहे. त्यामुळे सर्वांमध्येच उत्स्फूर्तपणा दिसून येत आहे. हा फेस्टीव्हल उत्स्फुर्तच व्हावा, असेच प्रयत्न सुरु असून यंदाही जालनेकरांसाठी दर्जेदार कार्यक्रम घेण्याचा मनोदय फेस्टीव्हलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी बोलून दाखवला. जालना गणेश फेस्टीव्हलच्या सभा मंडपाचे पूजन आज शुक्रवारी विनायक महाराज फुलंब्रीकर यांच्या मंत्रोच्चारात करण्यात आले. हा फेस्टीव्हल अत्यंत बहारदारपणे साजरा व्हावा, तो जनतेच्या लक्षात राहावा, असाच प्रयत्न करण्यात येत असून यासाठी प्रत्येकाच्या सूचनांचा आदर करण्यात येत आहे. हा फेस्टीव्हल अत्यंत चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी यासाठी समितीचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
जालना गणेश फेस्टिवलच्या सभा मंडपाचे पूजन उद्योजक घनशाम गोयल यांच्या हस्ते आज शुक्रवारी करण्यात आले. यावेळी जालना गणेश फेस्टीवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे, महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर, जालन्याचे डीवायएसपी श्री. अनंत कुलकर्णी, जालना गणेश फेस्टिवलची संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील, भास्करराव दानवे, राजेश राऊत, किरण गरड, सुरेश मुळे, प्रा.राजेंद्र भोसले, अशोक उबाळे, शरद देशमुख, साईनाथ पवार, गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोकराव पांगारकर, चमनचा राजा गणेश मंडळाचे अशोक पडुळ, ज्ञानेश्वर डुकरे, बबनराव गाडेकर, मंगेश चव्हाण, प्रशांत गाढे, रामा खांडे तसेच गणेश सुपारकर, राम सतकर, शंकर लुंगे, अजिंक्य घोगरे, प्रशांत वाढेकर, अशोकराव आगलावे, चंद्रशेखर वाळिंबे, जगन्नाथ काकडे, अवनिश गरड, प्रतिक दानवे, सचिन चौधरी, यांच्यासह कार्यक्रमास परिसरातील गणेश भक्तांची भोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय देठे यांनी तर शेवटी उपस्थितांचे आभार सुभाष कोळकर यांनी मानले.