पांडुरंग सांगू पाटील माध्यमिक विद्यालय चाणजे येथे राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचे उद्घाटन

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7
पांडुरंग सांगू पाटील माध्यमिक महाविद्यालय उरण या शाळेमध्ये राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या दिमाखात तालुक्यातील नामांकित बालरोग तज्ञ डॉक्टर विकास मोरे आणि डॉक्टर अजय कोळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली विद्यार्थ्यांना जंतनाशक मोहीम याबद्दल दिलेले मार्गदर्शन फारच मोलाचे होते या प्रसंगी मार्गदर्शक म्हणून लाभलेले दोनही बालरोग तज्ञ यांनी विद्यार्थी व सभागृहाला जंतनाशक मोहिमेबद्दल मार्गदर्शन केले
लहान मुलांचा शैक्षणिक विकास होण्याबरोबरच शारीरिक विकास होणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात. मैदानात खेळत असताना मुलांकडे नीट लक्ष न दिल्यास अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्यामध्ये कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. कृमीदोष बालकांना शारीरिकदृष्ट्या कमकुवत करतो. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. वैयक्तिक व आजूबाजूच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे कृमीदोषांचा संसर्ग होत असल्याचे दिसून येते. कृमीदोष हे कुपोषण व रक्तक्षयाचे कारण असल्यामुळे कृमीदोष आढळणारी मुले ही नेहमी अशक्त व थकलेली असतात तसेच यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढही खुंटते. त्यामुळे त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे कठीण जाते.
बालकांमध्ये आढळणाऱ्या कृमीदोषाचे गांभीर्य लक्षात घेता तो समूळ नष्ट करण्यासाठी शासनाने विविध उपक्रम राबवले आहेत. त्याच अनुषंगाने आरोग्य विभागाकडून ४ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम संपूर्ण देशात व राज्यामध्ये राबवण्यात येत आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा मूळ उद्देश १ ते ६ वयोगटातील सर्व मुले व ६ ते १९ वर्ष वयोगटातील शाळेत जाणाऱ्या व शाळेत न जाणाऱ्या सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देणे हा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले होऊन पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यास मदत होते . याबद्दल मार्गदर्शन केले तर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेंद्र इटकरे यांनी या जंतनाशक मोहिमेचे तालुक्यातील १ ते १९ वर्ष वयोगटातील ३३२७३ बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे येणार असल्याचे सांगितले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मातीतून प्रसारित होणाऱ्या कृमीदोषाचे प्रमाण जास्त आढळून येत असते . त्याच अनुषंगाने राज्यात ‘राष्ट्रीय जंतनाशक दिन’ वर्षातून दोनदा राबविण्यात येत आहेत जंतनाशक मोहिमेमुळे अनेक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदे होणार आहेत. त्यामध्ये बालकांमधील रक्तक्षय, अशक्तपणा व कुपोषणावर नियंत्रण तसेच बालकांचा बौद्धिक व शारीरिक विकास होणे याचा समावेश आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन राबविण्यात येत असतो ही मोहीम राबविण्यासाठी शाळा व अंगणवाडी या संस्था विशेष भूमिका बजावणार आहेत. त्यामध्ये सर्व शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा, महानगरपालिका व सर्व खाजगी अनुदानित शाळा त्याचबरोबर सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे यांचा समावेश करण्यात आला आहे यावेळी उपस्थित मुलांना एकाच वेळी जनता नाशकाची गोळी देऊन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमास उपस्थित मार्गदर्शक डॉ. विकास मोरे, डॉ.अजय कोळी बालरोगतज्ञ उरण , डॉ. बाबासो काळेल, वैद्यकीय अधीक्षक, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय उरण, डॉ. कविता भगत , वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली, डॉ. स्वाती म्हात्रे, राष्ट्रीय बाल स्वास्थ मिशन वैद्यकीय अधिकारी उरण, श्रीमती. स्नेहा चव्हाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी उरण, शाळेचे मुख्याध्यापक अनिल निकम, डॉ. मयुरी गावडे, समुदाय आरोग्य अधिकारी शरद घाडगे आरोग्य सहाय्यक , रामदास दिसले, कुष्ठरोग तंत्रज्ञ, संजय पेडणेकर ,आरोग्य सेवक आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.