जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी शिवराज मिटकरी तर सचिव पदी अनिकेत वाडकर
● भव्य शोभायात्रे सह विविध स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन ● महिलांचे लेझिम पथक ठरणार शोभयात्रेचे प्रमुख आकर्षक

गेवराई/प्रतिनिधी,दि.27
जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 894 व्या जयंतीच्या निमित्ताने 20 एप्रिल रविवार रोजी रेणुका देवी मंदिर येथे विरशैव समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी समाजाचे अध्यक्ष सतीशअप्पा रुकर व अनिलअप्पा शेटे, वैजिनाथअप्पा मिटकर, गणेश कापसे व शाम रुकर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये महात्मा बसेश्वर जयंतीची कार्यकरणी करण्याची निवड करून जयंतीच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 894 वी जयंती उत्सवाच्या व आनंदाच्या वातावरणात गेवराई शहरात साजरी करण्याचे बैठकीमध्ये ठरवण्यात आले. या जयंती उत्सवाचे अध्यक्ष शिवराज मिटकरी , उपाध्यक्ष रोहित फुलशंकर अनिकेत सचिव पदी अनिकेत वाडकर तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून साप्ताहिक गेवराई संघर्ष योद्धा चे संपादक अमोल कापसे, कोषाध्यक्ष म्हणून अजय रुकर व आनंद संभाहारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच बुधवार दि.30 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता श्री रेणुका देवी मंदिरात जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात येईल यानिमित्त निबंध स्पर्धा घेण्यात येणार असून या स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील लगेच करण्यात येणार आहे. जयंती च्या निमित्तसायंकाळी 5 वा जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे व्याख्यान होणार असून सर्व समाज बांधवानी याचा लाभ घ्यावा असे अध्यक्षानी आवाहन केले आहे तसेच दि.04 मे 2025 वार रविवार रोजी सकाळी 7 वा. जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री रेणुका देवी मंदिर येथून भव्य रथामधून महात्मा बसवेश्वरांच्या मूर्ती ची भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार असून या शोभा यात्रेमध्ये वीरशैव महिलां च्या लेझिम पथकाच्या साथीने व वीरशैव भजनी मंडळा सोबत टाळ मृदंगच्या गजरात भव्य शोभायात्रा निघणार असून यामध्ये महिलांना एकसारख्या साडया तर पुरुषांना पांढरा पेहराव असणार आहे ही शोभा यात्रा मेन रोड मार्गे तहसील रोड,पोलीस स्टेशन मार्गे शास्त्री चौक येथे आल्यानंतर अनिल आप्पा शेटे यांच्या वतीने सर्व समाज बांधवांना थंड शरबत चे वाटप करण्यात येणार असून त्यानंतर ही शोभा यात्रा माळी गल्ली, मोमीनपुरा मार्गे पुन्हा रेणुका देवी मंदिरात येऊन प्रसाद वाटपाने या जयंतीचा उत्सवाचा समारोप होणार आहे. त्याचबरोबर या दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे या बैठकीमध्ये ठरवले.
महात्मा बसवेश्वर जयंती चे सदस्य म्हणून रवींद्र रुकर,योगेश कापसे, सुनील संभाहरे,रमेश सोसे, प्रवीण राजुरे,नंदकिशोर कापसे, विनायक स्वामी, सुरेश कापसे,शंकर संभाहरे, उमेश राजूरकर, गणेश रुकर, संतोष सोसे, राजेंद्र फुलशंकर, संभाजी सोसे दिपक कापसे,अक्षय शेटे, गजानन कापसे, अनिकेत कापसे,श्रीनाथ सोसे,शुभम सांभहारे, अमोल फुलशंकर, अमोल संभाहरे, बबन शंखपाळ, विशाल कापसे, रोहित फुलशंकर, राम संभाहारे, दत्ता टोणपे, दिनेश संभाहारे, नागेश अप्पा परळकर, शंकर अप्पा परळकर आदी वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन उमेश राजूरकर यांनी केले तर आभार गणेश मिटकर यांनी केले.