pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अंगलगाव नगरीत भव्य दिव्य अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन

0 1 2 1 0 7

सातोना/ पांडुरंग शिंदे,दि.17

परतूर तालुक्यातील. अंगलगाव येथे 11 एप्रिल ते 18 एप्रिल या काळात संपूर्ण ग्रामस्थ मंडळीच्या विशेष सहकार्याने आणि सर्व तरुण मित्र मंडळीच्या सुंदर नियोजनातून भव्य दिव्य स्वरूपाच्या अखंड हरीनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले आहे.या मध्ये दैनंदिन पहाटे काकडा आरती,दिंडी प्रदिक्षणा ,ज्ञानेश्वरी पारायण, गाथाभजन,प्रवचन, व रात्री महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यामध्ये श्री भ प प्रवीण म लोळे,श्री ह भ प कृष्णा म कमानकर, श्री ह भ प माऊली म मुडेकर, श्री ह भ प पांडुरंग म शितोळे, श्री ह भ प शिवानंद म शाश्त्री, श्री ह भ प शिवा म बावस्कर, श्री ह भ प विलास म गेजगे व श्री ह भ प अक्रूर म साखरे यांचे कीर्तनं अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच दुपारी श्री ह भ प अमोलजी म बोधले यांच्या संगीत भागवत कथेच पण आयोजन केलेलं आहे.तसेच या साप्ताहामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम गायनाचार्य भजनसम्राट संगीत अलंकार उद्धवजी बापू शिंदे गुरुजी आळंदी व भजनसम्राट संगीत अलंकार शिवाजी जिजा काकडे गुरुजी आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदूंग सम्राट कृष्णाजी भोरकडे यांनी सुंदर रंग भरवला आहे.भूमिपुत्र गायनाचार्य श्री ह भ प निवृत्ती म शिंदे हे या कार्यक्रमांची रूपरेषा करत आहेत.पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सर्व सत्संग श्रवणाचा लाभ घ्यावा असे आव्हान संपूर्ण ग्रामस्थ मंडळी व संयोजक मंडळीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 0 7