जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती च्या अध्यक्ष पदी अजय रुकर तर सचिव पदी संदीप कापसे
भव्य शोभायात्रे सह रक्तदान शिबिराचे आयोजन

जालना/प्रतिनिधी,दि.9
जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 893 व्या जयंतीच्या निमित्ताने 28 एप्रिल रविवारी रेणुका देवी मंदिर येथे विरशैव समाजाच्या वतीने बैठकीचे आयोजिन करण्यात आले होते. बैठक समाजाचे अध्यक्ष सतीशअप्पा रुकर, अनिलअप्पा शेटे, शाम रुकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यामध्ये महात्मा बसेश्वर जयंतीची कार्यकरणी करण्याची निवड करून रूपरेषा ठरवण्यात आली. रविवार दि.12 मे 2024 रोजी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची 893 वी जयंती उत्सवाच्या व आनंदाच्या वातावरणात गेवराई शहरात साजरी करण्याचे बैठकीमध्ये ठरवण्यात आले, या जयंती उत्सवाचे अध्यक्ष अजय रुकर, उपाध्यक्ष अनिकेत संभाहारे, सचिव पद संदीप कापसे, कोषाध्यक्ष योगेश कापसे, सह कोषाध्यक्ष बसवराज मिटकरी, स्वागत अध्यक्ष गजानन कापसे, सह सचिव अनिकेत कापसे, संघटक श्रीनाथ सोसे, सह संघटक शुभम सांभहारे, सल्लागार वैजिनाथअप्पा मिटकर, रवींद्र रुकर, उमेश राजूरकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दि.12 मे 2024 रविवार रोजी सकाळी 8 वा.जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती श्री रेणुका देवी मंदिर येथून भजनी मंडळ च्या साथीने टाळ मृदंग च्या गजरात शोभायात्रा निघणार असून तहसील रोड पोलीस स्टेशन मार्गे शास्त्री चौक, माळी गल्ली, मोमीनपुरा, मार्गे पुन्हा रेणुका देवी मंदिरात येऊन प्रसाद वाटपाने या जयंतीचा उत्सवाचा समारोप होणार आहे. त्याचबरोबर यादिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे या बैठकीमध्ये ठरवले.
महात्मा बसवेश्वर जयंती चे सदस्य म्हणून सुनील संभाहारे, प्रवीण राजुरे, नंदकिशोर कापसे, गणेश रुकर, संतोष सोसे, राजेंद्र फुलशंकर, अक्षय शेटे, शंकर संभाहारे, अमोल फुलशंकर, अमोल संभाहरे, विशाल कापसे, रोहित फुलशंकर, राम संभाहारे, दत्ता टोणपे, दिनेश संभाहारे,नागेश अप्पा परळकर,शंकर अप्पा परळकर,आदी वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.
बैठकीचे सूत्रसंचालन उमेश राजूरकर यांनी केले तर आभार गणेश मिटकर यांनी केले.