pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

शैक्षणिक सुविधेसाठी घेतलेल्या पुढाकाराचा आदर्श ईतर ठिकाणी घेण्यासारखा – तहसीलदार विनोद गुडंमवार

पळसा येथील डिजीटल अंगणवाडीचा उदघाटन व सन्मान सोहळा संपन्न

0 1 7 4 1 2

हदगाव /प्रभाकर डुरके,दि.26

पळसा ता.हदगांव येथील सामाजिक कार्यकर्त्या सवीता विनोद निमडगे यांनी हदगाव सिडीपीओ उमेश मुदखेडे पर्यवेक्षीका वानखेडे यांच्या मार्गदर्शनातुन पुढाकार घेत सोशल मिडीयावर केलेल्या आवाहनाला निवृती वानखेडे मानवाडीकर,डॉ अंकुशराव देवसरकर,मधुकर बाबाराव माने ,अंगणवाडी सेविका बेबीताई सोनटक्के यांच्या विशेष योगदानासह सह सत्तर दानशूर व्यक्तीनी मदत केल्याने अंगणवाडीचा कायापालट झाला.
मंगळवार 26 डिसेबंर रोजी पळसा ता.हदगांव येथे चक्रवर्ती अशोक विद्यालयाच्या स्काउट च्या विद्यार्थ्याकडुन मानवंदना करण्यात आली. उपस्थित मान्यवराच्या हस्ते उदघाटन व दानशूर व्यक्तीसह मनाठा पोलीस ठाण्यात तिन वर्ष कौतुकास्पद कर्तव्य पार पाडलेल्या सध्या गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक टि.यु.चिट्टेवार व तालुक्यातील अनेक अंगणवाडी केंद्र डिजीटल केलेले सिडीपीओ उमेश मुदखेडे यांचा उल्लेखनीय कार्याबद्दल उपस्थित मान्यवराच्या हस्ते सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी पळसा येथील शिक्षणाचा पाया व मनुष्याच्या शेवटचे ठिकाण स्मशानभूमी आकर्षण ठरले आहे. ग्रामपंचायत व आयोजकांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक होत असून याची तालुका जिल्हा प्रशासनाने दखल घेतली आहे.जिल्हा प्रशासनासह अचानक आज पालकमंत्री नांदेड दो-यावर असल्याने येऊ शकले नसलो तरी हदगांव दो-यावर असताना अंगणवाडीस भेट देणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत राऊत यांनी सांगीतले असल्याचे सांगीतले. गरजेनुसार शिक्षणाचा पाया पक्का करण्यासाठी अंगणवाडीचा दानशूरानी केलेला कायापालट हा आदर्श ईतर गावानी घ्यावा असे आवाहन तहसीलदार विनोद गुडंमवार वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय मुरमुरे सिडीपीओ उमेश मुदखेडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना केले.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय मुरमुरे , ,सिडीपीओ उमेश मुदखेडे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेकडे उपनिरीक्षक टि.यु.चिट्टेवार, विस्तार अधिकारी सांवत, सोनार,उमेद तालुका व्यवस्थापक राऊत , भाजपा तालुका अध्यक्ष तातेराव वाकोडे पाटील,सरपंच आशाताई धाडेराव उपसरपंच संजय भाऊ काला माजी सरपंच शिल्पाताई कांबळे , पोलीस पाटील काशीराव मस्के ,शिक्षक काकडे, जावरकर, शिक्षीका भलगे व पंतगे, ग्रामसेवक कुणाल मांजरमकर,भाजपा तालुका उपाध्यक्ष शिवा वानखेडे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शितल भांगे पाटील ,पर्यवेक्षिका वानखेडे, ढवळे, कांबळे पोलीस पाटील काशीराव मस्के , अनेराये बेलदरा, पत्रकार ईस्माईल पिंजारी, बालाजी घडबळे,राहुल बहाद्दुरे,दिपकराव सुर्यवंशी, सुभाष पवार अंबाळकर, दुर्गाताई भारती, राजु पांडे हदगांवकर, गजानन अनंतवार कवानकर,फारुख पिंजारी, कुबेरराव राठोड, दिपक सुर्यवंशी ग्रामपंचायत सदस्य पत्रकार बांधव गावातील प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेवीका ऊमेद अभियानातील महीला बचत गटाच्या महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.सुत्रसंचलन विकास कांबळे यांनी केले तर आभार आयोजक सवीताताई विनोद निमडगे यांनी केले.

3/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे