अफवांवर विश्वास न ठेवण्याचे भोकरदन पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांचे जनतेला आवाहन.

भोकरदन/ संजीव पाटील,दि.25
भोकरदन पोलिस ठाणे हद्दीतील गावांमध्ये चोरांची टोळी फिरत असल्याचे, आणि जनावरांची चोरी करणाऱ्या पुर्वी ड्रोन कॅमेरा फिरत असल्याची अफवा समाजात मध्ये सोशल मीडिया द्वारे पसरविण्याचे काम सध्या सुरू असल्याचे दिसून येते. जुने फोटो आणि जुने व्हिडिओ प्रसारित करुन समाजात अफवा पसरवली जात आहे.अशा कोणत्याही प्रकारच्या घटना भोकरदन पोलिस ठाणे हद्दीत घडली नसुन. ड्रोन कॅमेरा फिरण्याचा आणि जनावरांची चोरी चां काही संबंध नाही. तसेच भोकरदन पोलिस ठाणे हद्दीतील प्रत्येक गावात ग्रा.प.ने पुढाकार घेऊन ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात यावे . गावात कोणी अनोळखी फेरी वाले , संशयित वाटल्यास पोलीसांना कळवावे. माराहण न करता पोलीसांना माहीती द्यावी. भोकरदन शहरांसह ग्रामीण भागात पोलीस पेट्रोलिंग सुरु आहे. जनतेने अफवांवर विश्वास ठेवु नये असे आवाहन भोकरदन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी जनतेला केले आहे.