pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

अंबड तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने आरक्षण वाचविण्यासाठी आमदार व तहसीलदार यांना निवेदन

0 1 7 4 1 1

अंबड/प्रतिनिधी, दि.2

अंबड : राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात सगे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राजपत्र असाधारण भाग चार ब दिनांक 26 जानेवारी 2024 नुसार मसुदा काढला आहे त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा निर्णय मूळ विषयावर अन्याय करणार आहे.
अंबड तालुक्यातील ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग यांचे आरक्षण वाचविण्यासाठी आज महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन भव्य मोटरसायकल रॉली काढण्यात आली व अतिशय अक्रमकतेने घोषणा देत बदनापूर व अंबड मतदार संघाचे आमदार नारायण कुचे व घनसावंगी मतदार संघाचे आमदार राजेश टोपे यांच्या कार्यालयावर घेराव घालून तीव्र निदर्शने करण्यात आली. व तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना गुरुवारी निवेदन सादर करण्यात आले आहे.

न्या.संदीप शिंदे समिती मर्यादित असून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवलेले नसताना समितीच्या शिफारशीवरून प्रशासनाकडून मराठा कुणबी प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे
मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्त्या इंटिग्रिटीनुसार केल्या गेल्या नाहीत.
मराठा आरक्षणाचे मागासलेपणा आणि संदर्भ तपासण्याची पद्धत वैज्ञानिक नाही
बेकायदेशीर आंदोलनाच्या नावाखाली राज्यातील प्रस्थापित जमीनदाराच्या मागास ठरवण्याची षड्यंत्र केले जात आहे.
मराठा समाजाचे मागासपण तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली आक्षेपहार्य पद्धतीचे आहे.
मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेल्या या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्याकारक असलेल्या निर्णयाला ओबीसी समाजाने विरोध केला असून 26 जानेवारीच्या अधिसूचनेचा मसुदा रद्द करण्यात यावा तसेच राज्य मागास आयोग व न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी आणि बेकायदेशीर रित्या वितरित होणाऱ्या मराठा कुणबी प्रमाणपत्र किंवा कुणबी मराठा प्रमाणपत्राच्या वितरणाला स्थगिती देण्यात यावी राज्यातील गोरगरीब ओबीसी भटक्या विमुक्त विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवावे अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.
प्रा.सत्संग मुंडे, प्रा. रवींद्र खरात, विठ्ठल सिंग राजपूत, दीपक ठाकूर,,बंटी आटोळे, बाळासाहेब दखणे, संदीप खरात, धर्मराज बाबर, भालचंद्र भोजने, हरिभाऊ विटोरे, बाळासाहेब तायडे, दिनेश गाजरे, मयूर बागडे, नंदकिशोर पुंड,बाबुराव खरात,रमेश शहाणे,रमेश बुंदेलखंडे, स्वप्निल पवार, संतोष राऊत, अमोल जाधव,सावता खांडेभराड , लक्ष्मण पेदे, शुभम जाधव, दत्ता टिळेकर, दिलीप राठोड , बद्री देवकर, भगवान टिळेकर, सुनील बिडे, युसुफ मणियार, सावता खांडेभराड, शिवप्रसाद गाजरे, निसार तांबोळी, नईम बागवान, विक्रम भागवत, रमेश राठोड, बाबासाहेब घोलप, सुनील राठोड, सुनील राऊत, नवनाथ जाधव, कपिल पाऊलबुदे, विजय पुंड, बाळू शिंदे, दत्ता मुर्तडकर, नवनाथ धुळे, यसपी निर्मळ, ईश्वर पिरणे, सचिन गाडेकर, गणेश पाऊलबुदे, गोरख हिरे यांच्यासह ओबीसी कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 1 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे