महाकाली देवि स्तवनार्थ होमाचा कार्यक्रम व श्रीशिव पुराण कथा ज्ञानयज्ञ पिंपळगाव मिश्री ता.नांदेड येथे संपन्न

नांदेड/चंपतराव डाकोरे,दि.13
नांदेड पासुन जवळच असलेल्या पिंपळगाव मिश्री येथे महाकाली देवि स्तवनार्थ होमाचा कार्यक्रम व श्रीशिव पुराण कथा ज्ञानयज्ञ हभप जोशी बाबा व श्री शामसुंदर महाराज तळेगावकर यांच्या कृपाशीर्वादाने हभप प्रभाकर महाराज पुयड यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.लक्ष्मीबाई देवकरीन यांच्या श्रमदानातून समस्त गावकरी मंडळीच्या सहकार्यातुनह.भ.प.गोपालकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणी तुन शिवपुराण कथाकार गोपालकृष्णजी महाराज मध्येप्रदेश यांनी दि.७ जानेवारी २०२५ ते १३ जानेवारी २०२५ पर्यंत भाविक भक्तांनी शिवपुराण कथेचे श्रवण केले.
दैनंदिन कार्यक्रम दररोज पहाटे ४ ते ६ देविची पुजा आरती दुपारी १२ ते ३ भक्तीची गिते,सायं ५ ते ७ देविची पुजा आरती सायं.७ ते १० शिवपुराण रात्री २० ते १२ देविजागर
दि.१३ जानेवारी २०२५ रोजी शिवपुराण कथा सांगता प्रसंगी नांदेड दक्षिणेचे आमदार यांच्या सौ.तिडके बोडांरकर ताई , बालाजी पाटिल पुणेगावकर , परिसरातील,व गावातील भाविक भक्त सांधुसंताच्या ऊपस्थित भक्त, महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.