pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पिकविम्यासाठी आज धानोरा (रू )शेतकऱ्यांचे उपोषण

0 1 2 1 1 2

निवघा बाजार/प्रतिनिधी,दि.2

खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये अतिदृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले, ही गंभीर परिस्थिती पाहता ७२ तासांच्या आत हाजारो शेतकऱ्यांनी पीक विमा मिळावा, यासाठी क्लेम दाखल केला. असे असतानाही युनिटेड इन्शुरन्स कंपनीने मोजक्या शेतकऱ्यांना पीक विमा देऊन बोळवण केली असल्याने सरसकट पिक विमा त्वरित मिळावा या मागणीसाठी ०३ ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालय समोर शेतकरी संघर्ष नेतृत्वात १२ शेतकरी आमरण उपोषण बसणार असल्याचे तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशन हदगाव येथे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हदगाव तालुक्यातील सन २०२२ ला अतिदृष्टीमुळे सर्व शेतकऱ्याचा पिकांचे १०० टक्के पूर्णत : नुसकासन झाले आहे तसेच युनायटेड कंपनीने सादरील पिकांचा २५% पिक विमा मंजूर केलेला आहे.त्यापकी उर्वरित राहिलेली विमा रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली नाही तसेच दिनांक २५ ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालयास निवेदन देऊन सुद्धा यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्यामुळे ३ ऑक्टोंबर रोजी तहसील कार्यालय हादगाव येथे १२ शेतकरी आमरण उपोषणास म्हटली आहे यावेळी . गजानन पाटील धानोरकर , माजी सरपंच साहेबराव देवराव शिंदे, धोंडबाराव मारोतराव शिंदे, मारुती सोनाजी शिंदे, प्रताप सोनाजी मगर, तुकाराम किसनराव शिंदे,भागवानराव रामराव चव्हाण, रवीकिरण शंकरराव पतंगे,बालाजी विठ्ठलराव शिंदे तानाजी दत्तराव शिंदे, यांच्या समवेत शेतकऱ्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 2 1 1 2