pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सनद पॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी शेतकरी प्रबोधिनी संस्थेतर्फे तहसीलदार व भूमी अभिलेख उपअधीक्षकांना निवेदन.

0 1 1 8 3 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.3

उरण तालुक्यातील बालई काळाधोंडा गावठाण हद्दीत अनेक नागरिक गेली अनेक वर्षे राहत आहेत.नागरिकांच्या या राहत्या घरास सनद प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ स्थळ पंचनामा करून सातबारा सदरी नोंद करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांच्या,गोरगरिबांच्या कष्टकरांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या शेतकरी प्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालय मधील उप अधीक्षक श्री.आतार व तहसीलदार उद्धव कदम यांची भेट घेउन त्यांना निवेदन दिले. बालई काळाधोंडा गावठाण हद्दीतील नागरिकांना सनद प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी तात्काळ स्थळ पंचनामा करून सातबारा सदरी नोंद करण्यात यावी अशी मागणी शेतकरी प्रबोधिनी या संस्थेच्या वतीने भूमी अभिलेख कार्यालय मधील उप अधीक्षक श्री. आतार व तहसीलदार उद्धव कदम यांना पत्रव्यवहाराद्वारे (निवेदनाद्वारे) करण्यात आली.यावेळी शेतकरी प्रबोधिनी या संस्थेचे अध्यक्ष राजाराम पाटील, बालई काळा धोंडा ग्रामविकास परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील , सचिव रविंद्र चव्हाण, खजिनदार- नितिन चव्हाण,सहसचिव- राहुल चव्हाण, चाणजे ग्रामपंचायत सदस्य- बबन चव्हाण, ग्रामस्थ -सूजित शिरढोणकर, मनोज भोईर , अनिल चव्हाण, शांताराम तुरळकर,दुर्गा गुडे, परेश चव्हाण, विनोद सावर्डेकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक श्री. आतार व तहसीलदार उद्धव कदम यांनी शेतकऱ्यांची , ग्रामस्थांची समस्या समजावून घेत सदर समस्या वरिष्ठापर्यंत पोहोचवून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

1932 च्या इंग्रजांनी केलेल्या मूळ गावठाण नकाशाच्या मोजणी नंतर विस्तारित गावठाणाचा नकाशा केंद्र किंवा राज्य सरकारने बनविलाच नाही.स्वतंत्र भारतात निष्क्रिय राहिलेल्या उरण तहसील आणि उरण भूमिअभिलेख कार्यालयाची ही अक्षम्य चूक तालुक्यातील आगरी कोळी कराडी ओबीसी आणि चर्मकार बौद्ध मातंग या एससी तर आदिवासी एसटी या देशातील 85 टक्के मागासवर्गीय जनतेसाठी डोकेदुखी ठरली आहे.सतत सत्तेत बसलेल्या उच्चवर्णीय राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मागास वर्गीय लोकांची केलेली फसवणूक आता समोर आली आहे.घराची घरपट्टी ही केवळ करपावती आहे.जमीन मालकी साठी घराखालची जमीन घरमालक असलेल्या उरणकरांची खरी खुरी प्रॉपर्टी आणि आयुष्य भराची ठेव आहे.बाळई काळा धोंडा येथील जागरूक चर्मकार ,कराडी आगरी कोळी बांधवानी घरांचे गावठाणाचे लोकवर्गणी काढून केलेले नकाशे,केलेला शासकीय पत्रव्यवहार हा ठाणे रायगड पालघर मुंबई साठी आदर्श ठरला.उरणच्या तहसीलदार आणि भूमी अभिलेख विभाग यांनी याची प्रथम सुनावणी लावून दिलेला ऐतिहासिक प्रतिसाद हा शासन आपल्या शेकडो वर्षाच्या चुका सुधारत असलेल्या प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण ठरत आहे.असे राजाराम पाटील यांनी यावेळी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4