pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पु. ना. गाडगीळ शोरूमचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उदघाटन.

0 1 7 4 0 8

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.25

पनवेल येथील पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स (पीएनजी)या शोरूमचे आधीपेक्षा भव्य व दिमाखदार असे नूतनीकरण करण्यात आले आहे. ग्राहकांच्या मिळणाऱ्या भरभरून प्रतिसादामुळे ग्राहकांना खरेदीचा आनंद देण्यासाठी, मनाला भुरळ पाडणाऱ्या ग्राहकांच्या आवडीच्या तीन हजारांहुन अधिक मनमोहक डिझाईन या शोरूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी या भव्य व दिमाखदार शोरूमचे उदघाटन रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पीएनजीचे मॅनेजिंग डायरेक्टर सौरभ गाडगीळ, सेल्स हेड सुरेश कृष्णन, जनरल मॅनेजर ऍडमिन निलेश कोळपकर, एरिया मॅनेजर मुंबई तुषार सप्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे