संतोषजी रांका यांचे निधन

पुणे/प्रतिनिधी,दि.16
येथील गंगाधाम परिसरातील रहिवासी श्री .संतोष सुर्यकांत रांका(वय ५२) यांचे दि.१३मे२०२३रोजी दुःखद निधन झाले.या दुःखद प्रसंगामुळे त्यांचे चाहते ,नातेवाईक ,भाविकांनी या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली.त्यांच्या मागे मोठा नाते परिवार असुन त्यांचा लोकसंपर्कही दांडगा होता.
स्व.संतोषजी रांका येथील ॐ विश्व नरेंद्र या वास्तुतील स्थापित ॐसाई विश्वनाथबाबा मंदिर येथुन भाविकांना मार्गदर्शन करीत असत.सर्वसामान्यांपासुन त्यांनी आपल्या गोड वाणी व प्रेरणादायी कार्यानुसार माणसे जोडुन प्रेमभाव निर्माण केला.त्यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ,प्रसन्न होता.चेहऱ्यावर नेहमी नावाप्रमाणेच संतोष व समाधान असायचे.संतोषजी बाबा म्हणून ते परिचित होते.प्रसन्न वदनेने ते सर्वांंची आस्थेवाईकपणे विचारपुस करीत असत.त्यांच्या या दुःखद निधनाने सर्व स्तरातील व्यक्तींनी भाविक चाहत्यांनी दुःख व हळहळ व्यक्त करुन भावपूर्ण श्रध्दांजली व्यक्त केली.