21 जुलै रोजी मराठवाडा शिक्षक संघाचे लक्षवेधी धरणे आंदोलन
मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालया समोर होणार आंदोलन;सर्वांना जुनी पेंन्शन आणि शंभर टक्के अनुदान यासह तेवीस मागण्यांचे दिले निवेदन.

जालना/प्रतिनिधी, दि.12
जालना : अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी, राज्यातील निकषपात्र विनाअनुदान शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रा नुसार 100% अनुदान देवून शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी, सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा व चौथा हप्ता अदा करावा, शिक्षकांना तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी या व इतर मागण्यांसाठी मागणीसाठी मराठवाडा शिक्षक संघ 21 जुलै रोजी मराठवाड्यातील सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालया समोर लक्षवेधी धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिली.
या बाबतीत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की राज्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी आकर्षक पेंन्शन योजना लागू करून घेतलेली असताना शिक्षक कर्मचा-यांना वा-यावर सोडण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांमध्ये तीव्र असंतोष आहे. अंशदायी पेंन्शन योजना रद्द करून सर्वांनाच जुनी पेंन्शन योजना लागू करावी, राज्यातील निकषपात्र विनाअनुदानित शाळा वर्ग आणि तुकड्यांना प्रचलित अनुदान सुत्रा नुसार 100% अनुदान देवून शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी,सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा चौथा हप्ता अदा करण्याचा शासनादेश निर्गमीत करण्यात आला परंतु अनेक जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना तिसरा हप्ता देखील मिळालेला नाही त्यामुळे तिसरा व चौथा हप्ता अदा करावा, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचा-यांना 10,20,30 या तीन लाभांची आश्वासीत प्रगती योजना लागू करावी, या व इतर तेवीस मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघ हे आंदोलन करत असल्याचे मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव,सरचिटणीस राजकुमार कदम, उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे,कोषाध्यक्ष औताडे ए. बी. केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रेमदास राठोड,आरेफ कुरेशी,जिल्हाध्यक्ष रमेश आंधळे,सचिव संजय येळवंते,कार्याध्यक्ष बाबासाहेब बिडवे मार्गदर्शक प्रा डॉ मारुती तेगमपुरे,पुरुषोत्तम जुन्ने,गौतम बनसोडे, प्रा दत्ता देशमुख, गजानन डोईफोडे,अनंता जायभाये,उपाध्यक्ष भीमाशंकर शिंदे,जगन वाघमोडे, कोषाध्यक्ष नारायण मुंडे,सहसचिव प्रद्युम्न काकड,गणेश चव्हाण,दीपक शेरे,प्रसिद्धी प्रमुख भगवान धनगे, पटेल,अंबड तालुका अध्यक्ष रमेश गाढे,सचिव गणेश मेहेत्रे, भोकरदन तालुका अध्यक्ष आनंदा वाघ सचिव जनार्दन कुदर ,उपाध्यक्ष सुधाकरराव डोईफोडे बदनापुर तालुका अध्यक्ष सुनील म्हस्के,सचिव देविदास बनकर,परतुर तालुका अध्यक्ष विजयकुमार खरात ,मंठा तालुका अध्यक्ष पांडुरंग राठोड ,घनसावंगी तालुका अध्यक्ष शिवहरी कायंदे ,रमेश मांटे , विष्णू इप्पर , जालना महिला शहराध्यक्ष ज्योती मगर पांगारकर महिला प्रतिनिधी अनिता पवार दंदाले ,उषा इंगळे ,जालना तालुका अध्यक्ष डी बी शेख , सचिव प्रशांत वाघ,सोहम बोदवडे अजित बारहाते,सी एस बट्टेवार यांनी म्हटले आहे.