घोगरी अनाथ कुटुंबाला रयत प्रतिष्ठानची मदत

हदगाव/प्रभाकर डुरके,दि 23
घोगरी ता.हदगाव येथील अनाथ कुटुंबातील पायल जाधव आईचे लहानपणी तर वडिलांचे दोन वर्षांपूर्वी निधनानंतर लहान बहीण भाऊ वयोवृद्ध आजी मानसिक आजाराचा काका अश्या हलाखीच्या परिस्थितीमुळे कुटुंबाची जबाबदारी एकट्या पायल वर पडली. अश्या दयनीय अवस्थेतील परीस्थितीची माहीती घोगरी येथील राम मोहिते यांनी रयत प्रतिष्ठानला दिल्याने विस एप्रिल रोजी रयत प्रतिष्ठान च्या वतीने अन्नधान्य आवश्यक साहित्यासह पुढील दोन महिन्याचे किराणासाठी मदत केली .तर सामाजिक कार्यकर्ते राजु भाऊ पांडे यांनी विवाह वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून या अनाथ कुटुंबासाठी तामसा येथील बंडेवार यांच्या कापड दुकानात कपडे खरेदी करून देत विवाह वाढदिवस केला. तर या अनाथ कुटुंबासाठी जिल्ह्यात गरजुसाठी आशेचा किरण ठरलेल्या नांदेड येथील साईप्रसाद परीवार पुढाकार घेत आहे. झालेल्या मदतीने समाधानी होत त्यांच्या चेह-यावर आंनद आश्रु दिसत होते.
यावेळी रयत प्रतिष्ठान अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर सामाजिक कार्यकर्ते राजु भाऊ पांडे हदगावकर पत्रकार राम मोहिते सहशिक्षक ढोकळे सामाजिक कार्यकर्त्या सविता निमडगे पळसेकर पत्रकार प्रभाकर दहिभाते पत्रकार भगवान कदम वालकीकर गावातील नागरिक उपस्थित होते.