लोककला सेवा मंडळ (आॕल इंडिया )च्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी नारायण उदावंत यांची नियुक्ती

पुणे/प्रतिनिधी,दि.25
लोककला सेवा मंडळ (आॕल इंडिया)एन.जी.ओ. नागपुर च्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते नारायण कंचक उदावंत यांची नुकतीच नियुक्ती झाली.या नियुक्तीचे पत्र लोककला सेवा मंडळ आॕल इंडिया चे पुणे जिल्हा अध्यक्ष नामदेव सुवर्णकार ,जिल्हा सचिव मधुकर टोंपे, जिल्हा कार्याध्यक्ष आत्माराम ढेकळे यांनी अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एंव शोध संस्थान चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामचंद्र कपिले यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.या नियुक्तीबद्दल नारायण उदावंत यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.लोककला सेवा मंडळ च्या स्थानक/राज्यस्तरीय व राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सहकार्य कराल अशीही अपेक्षा या नियुक्ती पत्रात नमुद करण्यात आली आहे.नवनियुक्त पदाधिकारी यांना प्रामुख्याने लोककला सेवा मंडळ (आॕल इंडिया )चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजकुमार घुले ,राष्ट्रीय महासचिव सुभाष तगाळे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेता राहा गंडाले, सहसचिव सौ. दर्शनाताई घुले, महाराष्ट्राचे प्रसिद्धी प्रमुख शिवाजी निरमनाळे, यांच्यासह लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाच्या सर्व पदाधिकारी,
महाराष्ट्र प्रदेश -अध्यक्ष बालाजी सुवर्णकार ,यांनी मंडळाच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.