इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रूग्णालय उरण व वीर वाजेकर कॉलेज फुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही एड्स ,टीबी, एसटीआय एच बीएसएजी अवरणेस कॅम्प संपन्न.

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.5
इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रूग्णालय उरण व वीर वाजेकर कॉलेज फुंडे यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही एड्स ,टीबी, एसटीआय एच बीएसएजी अवरणेस कॅम्प घेण्यात आला. या कॅम्प मध्ये डॉक्टर बाबासो कालेल वैद्यकिय अधिक्षक, प्राचार्य प्रल्हाद पवार , प्रॉ. चिंतामण धिंधले, महादेव पवार समुपदेशक व तृप्ती परजने प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित होते. या कॅम्प मध्ये डॉक्टर बाबासाहेब कालेल वैद्यकिय अधिक्षक यांनी उपस्थित सर्व विद्यार्थांना एच आय व्हीं म्हणजे काय, एड्स म्हणजे काय, ए आय व्ही होन्याची कारणे, इतिहास,निदान, गैरसमज, उपचार, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.त्यानतंर महादेव पवार समुपदेशक यांनी एचआयव्ही एड्स ऍक्ट २०१७ कायदा, गुप्तरोग, टिबी, आरोग्य याबद्दल सविस्तर मारगदर्शन केले. आणि शेवटी विद्यार्थी सोबत संवाद साधला त्यांचे प्रश्नांचे उत्तर देऊन त्याचं निरसन केले.या कॅम्प मध्ये एकूण ८५ विद्यार्थी उपस्थित होते. आणि त्यापैकी ३५ जणांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली.