pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

डॉ.संजीवनी तडेगांवकर यांना काव्ययोगिनी पुरस्कार घोषित

0 3 8 4 2 6

जाफराबाद/विशाल देशमुख,दि.27

पुणे येथील साहित्य भगिनी मंडळ संस्थेच्या वतीने जेष्ठ दिवंगत कवयित्री योगिनी जोगळेकर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी कवितेतील समग्र योगदानासाठी दिला जाणारा काव्ययोगिनी पुरस्कार यंदा जालना येथील भाव कवयित्री, मसाप केंद्रीय कार्यकारिणीच्या संचालिका डॉ.संजीवनी तडेगांवकर यांना घोषित झाला आहे.
रोख रक्कम ,सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून रविवारी (ता. 30) पुणे येथे होणाऱ्या 41व्या स्री लेखिका साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षा हिंदी लेखिका डॉ. सविता सिंह यांच्या हस्ते तसेच अ. भा. साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे ,लक्ष्मीकांत देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केला जाणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा अंजली कुलकर्णी ,विश्वस्त मंदा खांडगे यांनी कळवले.पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. संजीवनी तडेगावकर यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान डॉ.संजीवनी तडेगांवकर यांना यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारांसह यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर,महाराष्ट्र कामगार परिषद पुणे, कोपरगाव, नांदेड, जिंतूर येथील नामांकित संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे