pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पेन्शनधारकांना कोषागार कार्यालयाचे आवाहन मासिक निवृत्तीवेतन ई-कुबेर प्रणालीव्दारे

0 1 7 4 7 6

जालना/प्रतिनिधी,दि.2

जालना कोषागार कार्यालयातून सर्व निवृत्तीवेतन धारक,  कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांचे मासिक पेन्शन माहे एप्रिल-2024 पासून शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट पेंशनधारकांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच पेन्शनधारकांनी येथील कोषागारात पेन्शन जमा करण्यासाठी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आय.एफ.एस.सी. कोडनूसार पेन्शन जमा होईल.
जर काही पेन्शनधारकांनी कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर आपले बँक खाते इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करुन घेतले असेल तर अशा पेन्शनधारकांची पेन्शन जमा होण्यास अडचण निर्माण होईल. तरी ज्या पेन्शनधारकांनी कोषागार कार्यालयास न कळविता परस्पर बँक व बँक खात्यात बदल करुन घेतले असतील त्यांनी त्यांचे मुळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल तेच खाते सुरु ठेवावे, भविष्यात पेन्शनबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पेन्शनधारकांची राहील, असे  अपर कोषागार अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 4 7 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे