टेंभुर्णी/सुनिल भाले,दि.6
तथागत बुद्ध एक महान मानवतावादी तत्वज्ञानी.प्रा.सैलिप्रकाश वाघमारे.
टेंभुर्णी. येथील नालंदा बुद्ध विहारात वैशाख पौर्णिमा व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या 2567 व्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध व्याख्याते प्रा. .सैलिप्रकाश वाघमारे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध हे एक जागतिक ,वैश्विक पातळीवरील महान तत्त्वज्ञानी होते असे प्रतिपादन केले. बुद्ध जयंती निमित्ताने नालंदा बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रा.सैलिप्रकाश वाघमारे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या महान मानवतावादी मौलिक तत्वज्ञानाची आज ही जगाला गरज आहे असे प्रतिपादन केले. सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध यांनीच आम्हास -प्रेम करुणा, अहिंसा, सत्य, न्याय, बंधुता, सहिष्णुता, मानवता या तत्त्वांची देणगी दिली. तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सर्वप्रथम परंपरागत रूढी परंपरा कर्मकांड यांना छेद देत सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून सामान्य जनांना समजेल अशा साध्या सोप्या पाली या भाषेतून विज्ञानवादी मानवतावादी तत्त्वज्ञान दिले.संपूर्ण आयुष्यात शेकडो मैल पायी प्रवास करून, हजारो प्रवचन, धम्मदेसना देत मानवाला कल्याणाचा मार्ग दाखविला. त्यामुळेच आज अडीच हजार वर्षांनंतर ही तथागत गौतम बुद्ध यांचे विचार तत्कालीक, वास्तववादी ठरतात. दुःखाचे मूळ कारण हे मानवी तृष्णा आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले. मानवी जीवनात सुख, समाधान, शांतता, आरोग्य, हवे असेल तर , मानवाने अष्टांगिक मार्गाचा अवलंब केला पाहिजे, पंचशीलेचे पालन केले पाहिजे, असे महान तत्त्वज्ञान बुद्धांनी सर्वप्रथम जगासमोर मांडले,त्यामुळेच ज्या ज्या मानव समूहांनी प्रेम, करुणा, अहिंसा, सत्य, अपरिग्रह या तत्त्वांचा पुरस्कार केला त्या त्या मानव समूहाच्या जीवनात सुख,समाधान,शांतता प्रस्थापित झाली. आजही बुद्ध तत्त्वज्ञान मानवाला उपकारक आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. नालंदा बुद्ध विहारात आयोजित केलेल्या वैशाख पौर्णिमेच्या भरगच्च कार्यक्रमात धम्म उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी “खिरदान” ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून टेंभुर्णी शहराचे सरपंच प्रतिनिधी गौतम म्हस्के हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीचे कपिल जाधव, किशोर शेजुळ, रंजित जाधव, संदिप दांडगे, सूर्यप्रकाश मघाडे, पप्पू शिंदे, जगन मघाडे ,विलास पैठणे, अशोक मघाडे, पप्पू साबळे, समाधान मघाडे ,बाळू शिंदे, किरण कासारे, के.टी. चंदनशिवे. आकाश चंदनशिवे, अनिल गायकवाड, सतीश चंदनशिवे, राजाराम म्हस्के ,गणेश म्हस्के ,संजय वर्षिळ, सुरेश चंदनशिवे,रूपेश जाधव, विजय वरशिळ,राजु आढावे, गौतम छडीदार ,शुभम मोरे, आदींनी परिश्रम घेतले.