जालना – जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ.मा. श्री. नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेवरून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने जालना शहरातील प्रभाग क्रमांक. 13 व 14 माळीपूरा जामा मस्जिद येथे जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 20 डिसेंबर 2024 रविवार रोजी ईव्हीएम हटाव यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली आहे , या स्वाक्षरी मोहीम मध्ये माळीपूरा जामा मस्जिद परिसरातील नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, सदरील मोहीम यशस्वी करण्यासाठी निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभागाचे जिल्हाध्यक्ष जावेद अली, अब्दुल जब्बार ,शेख निजाम ,शफी अहमद, शेख अख्तर ,शेख जमीर सय्यद खालेद, शेख रफिक, शेख इमरान , शेख मुस्ताक ,मिलिंद नगराळे , शेख अली, जमीर खान, जानी बेग, शेख वजीर , शेख इरफान आदी कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा