pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

उरण विधानसभेत शिवसेनेचा झंजावात

उरण विधानसभेत शिवसेनेचा झंजावात

0 3 1 3 3 0

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8

हिंदूहदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन शिवसेना पक्षाचे नेते श्री एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा झंजावत सुरू आहे.उरण विधानसभेत सुध्दा मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्री. श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शना खाली उरण विधानसभेचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख अतुलशेठ भगत आणि तालुका प्रमुख दिपक ठाकूर यांच्या नेतृत्वात उरण विधानसभा मतदार संघात विविध विभागात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार गट मच्छीमार सेल महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनोहर ठाकूर, ॲड.योगेश बापर्डीकर उरण,सुनील भोईर (माजी तालुका अध्यक्ष मनसे ),महेश पाटील( शाखा प्रमुख केगाव दांडा ), रवींद्र म्हात्रे( माजी ग्रा. पं. सदस्य चाणजे ),प्रदीप मयेकर (जेष्ठ शिवसैनिक बोरी उरण)यांच्या समवेत पनवेल तालुक्यातील समाधान परदेशी, रोहीत वैराळे,जिगर परदेशी, अमोल लांडगे,चाणक्य, परशुराम कांबळे,सचिन दिपके,राम गवळी,रवी गवळी, निलेश आंबोरे, आलंतमश तुपके,वसिम शेख,गणेश कांबळे आदी असंख्य इतर पक्षाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी पक्ष प्रमुख तथा उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.तसेच गौरव गायकवाड यांची उपतालुका प्रमुख पनवेल आणि जसखार गाव शिवसेना शाखा प्रमुख पदी मेघनाथ ठाकूर व हर्षल ठाकूर यांची युवा सेना शाखा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख अतुल भगत आणि तालुका प्रमुख दिपक ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उरण विधानसभेत येणाऱ्या काही दिवसात असे अनेक इतर पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे पक्ष प्रवेश होतील असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले.सदर पक्ष प्रवेश कार्यक्रमावेळी युवा सेना सरचिटणीस रुपेश पाटील,उप जिल्हा प्रमुख विनोद साबळे,पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ पाटील,महिला जिल्हा अध्यक्षा मेघा ताई दमडे,रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे,विभाग प्रमुख अक्षय घरत, गणेश घरत तसेच उरण विधानसभेचे पदाधिकारी उपस्थित होते.तदनंतर सर्व उरण विधानसभेच्या समस्त पदाधिकाऱ्यांनी कर्जत विधानसभेचे विद्यमान आमदार श्री महेंद्र थोरवे यांना वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी जाऊन उरण विधानसभेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.तसेच उरण विधानसभेतील पक्ष प्रवेश शिवसेना सदस्य नोंदणी व तालुक्यातील बेरोजगारांसाठी मेळावा आयोजित करणे अशा अनेक विषयांवर यशस्वी चर्चा करण्यात आली. त्याच बरोबर मा. आमदार साहेबांनी पुढील वाटचालीसाठी जिल्हा प्रमुख व तालुका प्रमुख यांना शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 3 3 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
08:32