pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

सचिन गायकवाड श्री साई सन्मान पुरस्काराने सन्मानित.

0 1 1 8 3 4

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.28

कोरोना काळात ग्रामपंचायत वहाळच्या रुग्ण्वाहिकेवर ड्रायवरचे काम करणारे वहाळ गावातील सचिन गायकवाड यांचा श्री साई मंदिर येथे मंदिरांच्या पदाधिकाऱ्यांतर्फे श्री साई सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कबीर घरत यांच्या सोबत राहून स्मशान भूमीत लाकडे रचण्याचे काम, आजारी रुग्णा सोबत राहून त्यांचे मनोबल वाढविणे, रुग्णांना धीर देणे,स्मशान भूमीत राख थंड होईपर्यत तेथेच थांबून नातेवाईकांना आधार देणे, ईमरजन्सी मध्ये रुग्णवाहिका चालविणे आदि महत्वाची कामे त्यांनी केलेली आहेत.वहाळ,बामण डोंगरी, मोरावे, जावळे, उलवे नोड मधील नागरिकांना हॉस्पीटल मधून आणून दहन करण्याचे काम याच बरोबर जेवढे अपघात झाले तेवढ्यांना स्वतःच्या हाताने उचलून हॉस्पीटल मध्ये नेण्याचे काम सचिन गायकवाड यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत गुरुवार दि 27 जुलै 2023 रोजी श्री साई देवस्थान वहाळ तर्फे त्यांना श्री साई सन्मान पुरुस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी श्री साई देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष रविशेठ पाटील, विश्वस्त जगनशेठ पाटील, अनंत पाटील , मो का मढवी गुरुजी,माजी जिल्हा परिषद सदस्यां पार्वतीताई पाटील, विश्वास पाटील,एकनाथ ठाकूर आदी पदाधिकारी व साई भक्त यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 1 8 3 4

Related Articles