मंत्री अतुल सावे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई,दि.02
मंत्री अतुल सावे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अपारंपरिकऊर्जा व दुग्धविकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. महाराष्ट्र २०३० पर्यंत अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून ५० टक्के वीजेचा वापर करणारे देशातील पहिले राज्य ठरेल. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या तुलनेत प्रदूषणविरहीत अपारंपरिक ऊर्जास्त्रोत अमर्याद असून त्याला प्रोत्साहन देण्याची शासनाची भूमिका आहे. शासकीय इमारतीत २०२५ अखेरपर्यंत संपूर्णपणे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे उद्दीष्ट्य असून प्रत्येक शासकीय इमारतीत सौर विद्युत यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे.
राज्यातील खासगी, सहकारी संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणात दूध संकलन केले जाते. अनेक दूध विकास संस्था राज्यात कार्यरत असून त्यांनाही भेट देऊन आढावा घेतला जाईल. दूध भेसळ रोखण्यासाठी दुग्धविकास विभाग स्वतंत्र कायदा करण्याच्या तयारीत आहे असे मंत्री श्री. सावे म्हणाले