भाजपा जालना महानगर मंडळाच्या नवनियुक्त अध्यक्षांचा माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते सत्कार

जालना/प्रतिनिधी,दि.24
भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्हा अंतर्गत चार मंडळाच्या नियुक्त्या (ता.२०) जाहीर करण्यात आल्या असून यात नवीन जालना मंडळ अध्यक्ष श्री.सुनील खरे, जुना जालना मंडळ अध्यक्ष श्री.महेश निकम, पूर्व जालना मंडळ अध्यक्ष श्री.अमोल धानुरे महानगर ग्रामीण मंडळ अध्यक्ष पदी श्री.संजय डोंगरे यांचा सत्कार करून माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व पक्ष तत्त्वांना समर्पित राहून पक्ष संघटनाचे, जनसेवेचे अधिकाधिक कार्य आपल्या हातून संपन्न होईल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आ.नारायणभाऊ कुचे, जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, महानगर अध्यक्ष सतीश जाधव, अशोक अण्णा पांगारकर, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबिलिये, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष कपिल दहेकर, उद्योजक अर्जुन गेही, बबन नाना सिरसाठ, मुकेश चव्हाण, निवृत्ती लंके, रोहित नलावडे, दौलत भुतेकर, उद्धव ढवळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बाबासाहेब पाटील कोलते
प्रसिद्धीप्रमुख, भाजपा जि.जालना
९८६०७०७५००