pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

भारतीय सेवेतून सेवानिवृत्ती बद्दल धनंजय पांडे यांचा सन्मान सोहळा संपन्न

तहसीलदार डापकर पोलिस निरीक्षक जगन पवार यांची उपस्थिती

0 1 7 3 9 3

हदगाव/प्रभाकर डुरके,दि.10

हदगांव शहरातील भुमिपुत्र धनंजय रमेशराव पांडे भारतीय सेवेत बावीस वर्षे देशसेवा पुर्ण करीत नुकतेच सेवानिवृत्त झाले असल्याने चेहरा समोर न येता गेल्या अकरा वर्षांपासून अंखडीत निस्वार्थी कार्य करणाऱ्या नांदेड येथील साईप्रसाद परिवार,अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ तालुका हादगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने व हदगाव तालुक्याच्या वतीने तहसीलदार जिवराज डापकर व हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जगन पवार यांच्या सह तालुक्यातील आजी माजी भारतीय सैनिकांच्या उपस्थित सन्मान सोहळा संपन्न झाला.
साईप्रसाद परिवाराला चेहरा नसल्याने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सेवा निवृत्त भारतीय सैनिकांचा सपत्नीक आई वडीलांसह सन्मान करण्यात आला.यावेळी हदगाव तालुक्यातील ब्राह्मण समाजासह हदगांव शहरातील व्यापारी असोसिएशनच्या वतीने, जिजाऊ ब्रिगेड महासंघ,संत नाना महाराज देवस्थानचे जोशी गुरु ,नाभीक महामंडळासह , विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याला तालुक्यातील नुकतेच भारतीय सेवेत रुजू झालेले हडसणी येथील भुमिपुत्र नामदेव श्रिमंगले यांच्या सह विनोद मस्के पळसेकर,खय्युम उर रहेमान हदगांव,बालाजी वानखेडे,शेख चांद,शिवाजी सुर्यवंशी, प्रदिप सुर्यवंशी, रंगराव लकडे, किशनराव सुर्यवंशी, पंजाबराव पवार,राम कौशल्य, यशवंत हराळे,डोरलीकर, यांच्या सुट्टी वर आलेले , सेवा निवृत्त झालेल्या भारतीय सैनिकांनी उपस्थिती लावली होती.यावेळी तहसीलदार जिवराज डापकर पोलिस निरीक्षक जगन पवार यांनी उपस्थितांना देशसेवेविषयी मार्गदर्शन करीत साईप्रसाद परिवाराच्या निस्वार्थी कार्याचे कौतुक केले.
यावेळी पंचशील विद्यालयाच्या सेवा निवृत्त मुख्याध्यापिका हदगांव मडम, शिक्षक ताडेवार, शिक्षक चौरे, सेवा निवृत्त गटशिक्षणाधिकारी जाधव वाटेगावकर, शिक्षक डोरले, वर्गातील मित्र माजी नगराध्यक्ष अमीत अडसूळ, विनोद राठोड, पत्रकार हिमांशु इंगोले, बालाजी पोटे, दिपक सुरोशे, संदिप धुळे, गजानन लोहेकर, अविनाश शहाणे,संजय भोरे,भानुदास महाराज,विजय वाटेगावकर दीपक जोशी,पत्रकार शशिकांत धानोरकर,श्रीपाद पांडे सह सटवाजी पवार जवळगावकर, निवृत्ती वानखेडे मानवाडीकर, गजानन अंनतवार कवानकर, सामाजिक कार्यकर्त्या सवीताताई निमडगे पळसेकर, शिवकांत मुधोळकर, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार पंडितराव पतंगे, पत्रकार गौतम वाठोरे, पत्रकार शेहबाज शेख, पत्रकार बंडु माटाळकर, पत्रकार महेंद्र धोंगडे, पत्रकार गजानन जिद्देवार, पत्रकार भगवान कदम यांच्या सह तालुक्यातील राजकीय सामाजिक विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी समाज बांधव देशप्रेमी बांधव साईप्रसाद परिवाराचे सदस्य स्वयंसेवक उपस्थित होते.सुत्रसंचालन सचिन पांडे यांनी केले तर ते आभार परीश्रम सामाजिक कार्यकर्ते राजु पांडे , खय्युम उर रहेमान, शिवकांत मुधोळकर , प्रभाकर दहिभाते यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 7 3 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे