सरस्वती भुवन प्रशालेत दक्षता दिन साजरा
जालना/प्रतिनिधी,दि. 17
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत चालणारे नेहरू युवा केंद्र, जालना यांच्या वतीने जिल्हाभरात 12 ते 19 जानेवारी 2024 कालावधीत राष्ट्रीय युवा सप्ताह राबविला जात आहे. नेहरु युवा केंद्र व बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जालना यांच्या संयुक्त़ विद्यमाने 16 जानेवारी 2023 रोजी दक्षता दिनानिमित्त़ क्रीडा स्पर्धेचे आयोजन सरस्वती भुवन प्रशाला, जालना येथे करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे मुख्याद्यापक श्री.महाजन, उपमुख्याध्यापक श्री.देठे, क्रीडा शिक्षक सच्चिदानंद जहागीरदार यांनी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन विद्यार्थ्यांना दक्षता दिनाचे महत्व़ सांगितले व क्रीडा स्पर्धेची सुरुवात केली. क्रीडा स्पर्धेमध्ये 200 मीटर धावणे व कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेची शिक्षकवृंद व विद्यार्थी युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.